‘स्त्री’, ‘मुंज्या’, ‘भेडिया’, ‘मिमी’, ‘लुका छुप्पी’, ‘छावा’ असे बरेच चित्रपट बनवणारी निर्मिती संस्था मॅडडॉकला २० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मॅडडॉक निर्मिती संस्थेने मुंबईत खास ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. या ग्रँड पार्टीमध्ये बॉलीवूडमधले अनेक सेलिब्रिटींनी खास हजेरी लावली होती. मॅडडॉकच्या ग्रँड पार्टीचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीतील अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा व अक्षय कुमारची भाची सिमर भाटियाच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अगस्त्य नंदा नेहमी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख खानची लेक सुहाना खानला अगस्त्य डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघं नेहमी वेगवेगळ्या पार्टी व कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असतात. पण, नुकत्याच झालेल्या मॅडडॉकच्या ग्रँड पार्टीमध्ये अगस्त्य अक्षय कुमारची भाची सिमर भाटियाबरोबर पाहायला मिळाला. दोघांचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये मॅडडॉकच्या ग्रँड पार्टीतील रेड कार्पेटवर अगस्त्य नंदा सिमर भाटियाबरोबर येताना दिसत आहे. यावेळी अगस्त्य सिमरनबरोबर पोज देतो आणि त्यानंतर असं काही करतो की, ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिमरबरोबर पोज दिल्यानंतर दोघं एकत्र निघून जातात. पण तितक्याच अगस्त्य सिमरला सिंगल पोज देण्यासाठी सांगतो आणि स्वतः पुढे निघून जातो. मग सिमर एकटीचं पोज देताना दिसत आहे. अगस्त्याच्या याच कृतीचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॅडडॉकच्या ग्रँड पार्टीमध्ये अगस्त्य गडद निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तो खूप हँडसम आणि डॅशिंग अंदाजात दिसत आहे. तर सिमर भाटिया अ‍ॅनिमेटेड ड्रॅगन थीमच्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या ग्लॅमरस लूकचं बऱ्याच नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. अक्षय कुमारची बहीण अलका भाटियाची मुलगी सिमर आहे. लवकरच ती श्रीराम राघवन यांच्या बहुप्रतीक्षित ‘इक्कीस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सिमर अगस्त्य नंदाबरोबर झळकणार आहे. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या एका बाप-लेकाच्या नात्याची कथा ‘इक्कीस’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अगस्त्यने लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.