Amitabh Bachchan Health Updates : वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी बिग बी अमिताभ बच्चन आजही तितक्याच जिद्दीने काम करतात. त्यांचे अजूनही काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘प्रोजेक्ट के’. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची त्यांनी हैदराबादमध्ये सुरुवात केली होती. मात्र त्यांना चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – Amitabh Bachchan : हैदराबादमध्ये चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी? म्हणाले, “श्वास घेण्यासाठीही…”

Rekha intimate scenes with shekhar suman
४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”
ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

अमिताभ यांनी सोमवारी (६ मार्च) याबाबत माहित दिली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय डॉक्टरांनीही काही दिवस आराम करण्याचा सल्ला अमिताभ यांना दिला आहे. “हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत असताना मी जखमी झालो आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली”. असं अमिताभ यांनी सांगितलं.

आता त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. अमिताभ म्हणाले, “तुम्ही माझ्याकडे इतकं लक्ष देत आहात त्यासाठी तुमचे आभार. हळूहळू माझी प्रकृती सुधारत आहे. पण यासाठी थोडा वेळ लागणार आहे. डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्याचं मी नियमितपणे पालन करत आहे”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर प्रियदर्शनीने सोडंल मौन, म्हणाली, “मैत्री वाढली आणि…”

शिवाय अमिताभ यांनी मुंबईतील त्यांच्या जलसा बंगल्यावर होळीचं सेलिब्रेशन केलं. तसेच त्यांनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अमिताभ यांची इतरही कामं बंद आहेत. गंभीर दुखापतीमुळे त्यांना श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. याबाबत अमिताभ यांनी स्वतःच सांगितलं होतं. पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.