अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुंबईतील जुहू भागातील एक बंगला मुलगी श्वेता बच्चन नंदाच्या नावे केला आहे. बिग बींनी मुलीच्या नावे केलेल्या बंगल्याची सध्याची किंमत ५० कोटींहून अधिक आहे. अमिताभ त्यांच्या करिअरमधील सुरुवातीच्या दिवसात याच बंगल्यात राहायचे. त्यांनी मुलीच्या नावे केलेल्या बंगल्याचे नाव ‘प्रतिक्षा’ आहे. एक बंगला श्वेताला दिल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही अपत्यांबाबत केलेल्या एका जुन्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

जवळपास सहा दशकं अमिताभ बच्चन सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. त्यांच्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये त्यांनी खूप संपत्तीही गोळा केली आहे. काही वर्षांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर बिग बींनी त्यांच्या मृत्यूनंतर या संपत्तीचे काय होईल, याबाबत भाष्य केलं होतं. “माझ्या मृत्यूनंतर ही कोट्यवधी रुपयांची संपत्ती माझी दोन्ही मुलं अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांच्यामध्ये सारखी विभागली जाईल,” असं ते म्हणाले होते.

अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदाला भेट दिला जुहूतील आलिशान बंगला, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

इतकंच नाही तर त्यांनी एकदा एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून आपल्या संपत्तीचं काय होईल, हे सांगितलं होतं. “जेव्हा मी मरेन, तेव्हा मी मागे जी काही संपत्ती सोडून जाईन ती माझा मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटली जाईल,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. आज आपण अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती, त्यांचं कार कलेक्शन आणि बंगले याबाबत जाणून घेणार आहोत.

“मी आधी मॅडम म्हणायचो, पण आता…”, अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चनना ‘या’ नावाने मारतात हाक

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांचे मुंबईत तीन बंगले आहेत. ‘प्रतिक्षा’ बंगला श्वेताला दिल्यानंतर त्यांच्याकडे ‘जलसा’ आणि ‘जनक’ असे आणखी दोन बंगले आहेत. बच्चन आपल्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून ‘जलसा’मध्ये राहतात. त्याची एकूण संपत्ती ३,३०० कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बींच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत चित्रपट आहेत. ते त्यांच्या एका चित्रपटासाठी किमान ६ कोटी रुपये मानधन घेतात. ते टीव्हीवरील लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करतात. ते अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातीही करतात, यातून त्यांची कमाई होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ते एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी ५ ते ८ कोटी रुपये घेतात.

“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोट्यवधींच्या तीन बंगल्यांसह अमिताभ बच्चन यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याजवळ बेंटले, रोल्स रॉयस, ऑडीसह अनेक गाड्या आहेत. बेंटले कॉन्टिनेंटल जीटीची किंमत ३.२९ ते ४.४ कोटी, Rolls Royce Phantom ची किंमत ८.९९ कोटी, Lexus LX570 ची किंमत २.३२ कोटी आणि Audi A8L ची किंमत १.६४ ते १.९४ कोटी आहे. एवढंच नाही तर बिग बींकडे स्वतःचे खासगी जेट देखील आहे. त्याची किंमत जवळपास २६० कोटी रुपये आहे.