बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन मोठ्या प्रमाणत सक्रिय आहेत. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला लाखोंच्या संख्येत लाईक्स मिळत असतात. मात्र, नुकतंच अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या एका फोटोवरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. कोणता फोटो आणि ट्रोलिंगच कारण काय? घ्या जाणून

हेही वाचा- ‘आश्रम’मधील ‘बबिता’ अडकणार लग्नबंधनात; त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा, म्हणाली “पुढील वर्षी…”

अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन तुळशीला पाणी घालताना दिसत आहे. अमिताभ यांनी फोटो शेअर करत लिहिलं “तुळशीवर पाणी, रोज” या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोल केल आहे. अमिताभ बच्चन डाव्या हाताने तुळशीला पाणी घातलाना दिसत आहेत त्यामुळे ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधाला आहे.

हेही वाचा- रश्मिकानंतर कतरिना कैफचा डीपफेक फोटो व्हायरल, ‘टायगर ३’ मधील टॉवेल सीन केला मॉर्फ

एका युजनरने कमेंट करत लिहिलं – ‘पाणी दोन्ही हातांनी दिले जाते.’ तर दुसऱ्याने “पाणी कधी डाव्या हाताने अपर्ण केलं जात नाही” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने लिहिलं “रविवारी तुळशीला पाणी अपर्ण केलं जात नाही.”

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच कौन बनेगा करोडपतीमध्ये सांगितले होते की, त्यांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. ते म्हणालेले की ब्लॉग लिहिताना आपण तो प्रकाशित करूया असे मला वाटते. मग मी त्यातून एक उतारा काढून सोशल मीडियावर पोस्ट करतो. आणि त्या पोस्टवरच्या कमेंट वाचण्यात आपण वेळ घालवतो. कमेंट करणाऱ्या व्यक्तीशी आपला काही संबंध असो वा नसो, पण त्या कमेंट वाचण्यात दीड ते दोन तास निघून जातात. ही खूप वाईट सवय आहे.

हेही वाचा- स्क्रिप्टमध्ये नव्हता ‘अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है’ डायलॉग, अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला, “श्रेयस तळपदे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा गणपत चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्याबरोबर टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननची मुख्य भूमिका होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खास कमाई करु शकला नाही.