आधी ट्विटर अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागत नव्हते, पण नंतर एलॉन मस्क यांनी सबस्क्रिप्शनची घोषणा केली. त्यानुसार, ट्विटरचे सबस्क्रिप्शन न घेणाऱ्या युजर्सची ब्लू टिक २२ एप्रिलपासून हटवण्यात आली. ब्लू टिक गमावणाऱ्यांमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. बिग बी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अशातच ब्लूक टिक गेल्यानंतर त्यांनी केलेले ट्वीट खूप व्हायरल झाले होते.

‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत रविवारी मोठी वाढ; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, सलमान खान पोस्ट करत म्हणाला…

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट मध्ये लिहिले की, “ट्विटर दादा, ऐकतोय का, आम्ही आता पैसे पण दिले आहेत तर आता ते जे निळं कमळ लावतात नावाच्या पुढे तो पुन्हा लावून द्या की, म्हणजे निदान लोकांना कळूदे की मीच अमिताभ बच्चन आहे, हात तर जोडलेत आता काय पाया पडू का?” असं ट्वीट त्यांनी केलं होतं. नंतरही त्यांनी मस्क यांच्यावर मिश्किल टिप्पणी करणारे दोन ट्वीट केले होते.

नंतरच्या ट्वीटमध्ये बिग बी यांनी ब्लू टिक परत मिळाल्याबद्दल मस्क यांचे त्यांच्या खास अंदाजात आभार मानले होते.

बिग बी यांनी आज पुन्हा एक ट्वीट केलं आहे. त्यातही त्यांनी ब्लू टिकचा उल्लेख केला आहे. “ए, ट्विटर! मी ब्लू टिकसाठी पैसे भरले आणि आता तुम्ही म्हणताय की ज्यांचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांना ब्लू टिक फ्रीमध्ये मिळणार. माझे तर ४८.४ मिलियन फॉलोअर्स आहेत, आता? खेल खतम, पैसा हजम?”, असं बिग बी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ट्विटरने ब्लू टिक हटवल्याचा फटका अनेकांना बसला होता. अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, शाहीद कपूर यांच्यासह अनेकांच्या ब्लू टिक ट्विटरने हटवल्या होत्या.