आज (२२ जानेवारी रोजी) अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सजली आहे. या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी, अनेक दिग्गज राजकारणी आणि सिनेसृष्टीतील कलाकार अयोध्येला पोहोचत आहेत. बॉलीवूडमधील दोन लोकप्रिय जोड्या या कार्यक्रमासाठी मुंबईतून रवाना झाल्या आहेत.

आलिया भट्ट व रणबीर कपूर यांना काही दिवसांपूर्वी राम मंदिरा उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. आलिया व रणबीर जातील की नाही, याबाबत सोशल मीडियावर चर्चा होती. पण रणबीर पत्नी आलियाबरोबर अयोध्येला रवाना झाला आहे. दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत रणबीर कपूर पांढरे धोतर व कुर्ता घालून दिसत आहे, तर आलिया भट्टने आकाशी रंगाची साडी नेसली आहे. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक रोहित शेट्टीदेखील होता. विरल भयानी या अकाउंटवरून या सेलिब्रिटींचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच हिंदू समाजाचा…”, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी वक्तव्य

अयोध्येला रवाना झालेलं दुसरं जोडपं म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ होय. हे दोघेही राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मुंबईतून अयोध्येच्या दिशेने निघाले. यावेळी विकीने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. तर कतरिना कैफने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. व्हिडीओमध्ये हे दोघेही सुंदर दिसत आहेत.

सुपरस्टार अमिताभ बच्चन अयोध्येला रवाना झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होणार आहे.

माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेनेदेखील अयोध्येला रवाना झाले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं आहे. कंगना रणौत तर दोन दिवसांआधीच अयोध्येला पोहोचली आहे. याशिवाय ‘रामायण’ मालिकेत राम, लक्ष्मण व सीता यांच्या भूमिका साकारणारे अरुण गोविल, सुनील लहरी व दिपिका चिखलियादेखील अयोध्येत या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.