काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. अलीकडेच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. दोघे एकत्र पार्टीत पोहोचले होते, तेव्हापासून त्यांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. त्यानंतर अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. आता त्या दोघांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र वॉक केल्याने या दोघांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Oscar Awards 2023 Live : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; भारताने कोरले ऑस्कर पुरस्कारावर नाव

लॅक्मे फॅशन विकच्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या ग्रँड फिनालेमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरही दिसले. दोघेही मनिष मल्होत्राचे शो स्टॉपर होते. त्यांनी एकत्र वॉक केला आणि पोज दिल्या. या दोघांचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आदित्य काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतोय. तर, अनन्याने हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य आणि अनन्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत आहेत. सिद्धार्थ कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीशिवाय, हे दोघं क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीतही दिसले होते. अंगद बेदी आणि नेहा धुपियाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले होते. जिथे दोघेही बोलताना दिसले होते, त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता. दरम्यान, या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही.