बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीचा आज वाढदिवस आहे. २००४ साली ‘काया तारन’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अंगदने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. रणजी ट्रॉफी तसेच १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाकडूनही अंगद खेळला आहे. करिअरप्रमाणेच अंगद त्याचं वैयक्तिक आयुष्य व लव्ह लाइफ यामुळेही चर्चेत होता.

अंगदने २०१८ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्नगाठ बांधली. पण नेहाशी लग्नगाठ बांधण्याआधी त्याने ७५ महिलांना डेट केलं होतं. अंगदने स्वत:च याचा खुलासा एका मुलाखतीदरम्यान केला होता. मुलाखतीत नेहाने अंगदला “खिलाडी” म्हणत हाक मारली आणि तू किती जणींना डेट केलं आहेस असं विचारलं. यावर उत्तर देताना अंगदने वयाने मोठ्या असलेल्या ७५ महिलांना डेट केल्याचं सांगितलं.

हेही वाचा>> बीएमडब्ल्यू गाडी, घरासाठी पैसे अन्…; सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीने घेतलेले महागडे गिफ्ट

हेही वाचा>> भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

मीडिया रिपोर्टनुसार, अंगद बेदी व बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही यांचं अफेअर होतं. परंतु, त्याचदरम्यान नेहाबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ती गरोदर राहिल्याने अंगद व नेहाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंगदने नोराबरोबर ब्रेकअप केलं होतं. ब्रेकअपनंतप नोराला मानसिक त्रास झाल्याचं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.

हेही वाचा>> Video: सिद्धार्थ-कियाराचा बॉलिवूड गाण्यांवर डान्स; पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंगद बेदी व नेहा धुपियाने २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर ते आईबाबा झाले. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.