रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ९०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्यांप्रमाणेच ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या फ्रेडी पाटील भूमिकेची देखील सर्वत्र चर्चा रंगली होती.

‘अ‍ॅनिमल’मध्ये उपेंद्र लिमये यांनी शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डीलरची लहानशी भूमिका साकारली आहे. लहान असली तरीही ही भूमिका प्रेक्षकांसाठी चांगलीच लक्षवेधी ठरली. उपेंद्र यांच्या एन्ट्रीच्या सीनचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. याचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा : “सासू, नणंद वगैरे…”, ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर चाहतीची कमेंट; अभिनेत्री म्हणाल्या, “माझ्या सासरचे…”

‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर बॉलीवूडप्रमाणे मराठी कलाविश्वात देखील उपेंद्र यांची जोरदार चर्चा रंगली होती. बिग बजेट सिनेमातील कामाचं भरभरून कौतुक झाल्यावर आता उपेंद्र लिमये पुन्हा एकदा बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांनी नव्या सिनेमाची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : आघाडीची अभिनेत्री असलेल्या स्पृहा जोशीला एकेकाळी वाटायची ऑडिशनची भीती! म्हणाली, “घराबाहेर पडायचे अन्…”

View this post on Instagram

A post shared by Upendra Limaye (@upendralimaye)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अ‍ॅनिमल’नंतर उपेंद्र लिमये हे अभिनेता कुणाल खेमू लिखित-दिग्दर्शित ‘मडगाव एक्स्प्रेस’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. यामध्ये अविनाश तिवारी, प्रतिक गांधी, दिव्येंदु यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. ‘मडगाव एक्स्प्रेस’ हा बहुचर्चित चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.