बॉलीवूडमधील स्टार जोडपं दीपिका पादुकोण व रणवीर सिंग आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. त्यांच्या घरी सप्टेंबर महिन्यात चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे. रणवीर व दीपिका दोघांचे कुटुंबीयही पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पहिल्या बाळाचं सप्टेंबरमध्ये आगमन होणार आहे, अशी घोषणा केली होती. गूड न्यूज दिल्यानंतर रणवीर आणि दीपिका यांनी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये हजेरी लावली होती. आता दीपिकाची बहीण अनिशाने या आनंदाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Ian Smith's reaction to Rishabh Pant
T20 WC 2024 : पंतची गिलख्रिस्टशी तुलना करण्यावर माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याच्यासारखा बनण्यासाठी पंतला अजून…’
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
Swara Bhasker Reacts On Kangana Ranaut Slap
“किमान ती जिवंत आहे…”, कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याप्रकरणी स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली, “या देशात…”
Saurabh Netrawalkar Statement on Suryakumar Yadav Dropped Catch
IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’
Luv Sinha reacts on Sonakshi Sinha zaheer iqbal wedding
शत्रुघ्न सिन्हांनंतर आता सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल तिच्या भावाची प्रतिक्रिया, म्हणाला, “मी सध्या…”
Challenges facing India Aghadi politics bjp
लेख: इंडिया आघाडीसमोरील आव्हाने
Son Surprised Father With PSI Result on call emotional video goes viral
“हॅलो बाबा पीएसआय गोकुळ देशमुख बोलतोय” निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा वडिलांना केला फोन; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

राखी सावंत बुरख्याच्या आत बिकिनी घालून…; फराह खानने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम करणं…”

अनिशा पादुकोणला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन होणार आहे, त्याबद्दल तिला कसं वाटतंय? त्यावर “खूपच छान! पहिल्यांदा कळालं तेव्हाची भावना खूपच सुखद होती,” असं अनिशा म्हणाली. बाळाला कोण जास्त बिघडवण्याची शक्यता आहे असं विचारलं असता अनिशा म्हणाली, “मला रणवीरचं नाव घ्यायचं आहे, पण मला असंही वाटतंय की बाळाला माझे आई-बाबाही बिघडवू शकतात.”

“तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान; म्हणाला, “त्याच्या वडिलांनी…”

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रणवीर-दीपिकाने जबरदस्त डान्स केला होता. त्यांचे डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. कामाबद्दल बोलायचं झाल्यास दीपिका लवकरच ‘सिंघम अगेन’ आणि ‘कल्की 2898 एडी’ मध्ये दिसणार आहे.