बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडचे दिग्गज कलाकार मुकेश ऋषी यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे.

काय म्हणाले मुकेश ऋषी?

‘रेडिओ नशा ऑफिशिअल’ला मुकेश ऋषी यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, धर्मेंद्र हे असे अभिनेते आहेत, ज्यांचे पोस्टर माझ्या कपाटात लावलेले असायचे आणि जेव्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची वेळ आली तेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी अविश्वसनीय होती. मला आठवतं, ते सीनच्या शूटिंगसाठी सेटवर आले. मला माहित होतं, धर्मेंद्र सेटवर आले आहेत. पण मी त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी गेलो नाही. मी माझ्या सीनसाठी स्क्रीप्ट पाठ करत होतो. मी सेटवर गेलो तेव्हा तिथे आधीच धर्मेद्र होते पण त्यांच्याकडे पाहिलं नाही. सीन शूट झाला आणि मी धर्मेंद्र यांचे पाय धरले. मी सीन शूट होण्याची वाट बघत होतो. जर सीन शूट होण्याआधी मी त्यांना भेटलो असतो तर तो सीन व्यवस्थित शूट झाला नसता. मला त्यांच्याप्रति खूप आदर होता आणि त्यामुळे मी त्यांच्यासमोर तो सीन नीट करू शकलो नसतो. मोठ्या लोकांना कसे सामोरे जायचे या गोष्टी शिकल्या होत्या. हे सगळं शिकवणारा दुसरा कोणताही कोर्स उपलब्ध नाही. तुम्हाला स्वत:लाच काही गोष्टी शिकायला लागतात. मोठ्या लोकांना सामोरे जाण्याचा आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा हा माझा मार्ग होता आणि मी असेच दिग्गज लोकांना सामोरे जायचो. असे या मुलाखतीत मुकेश ऋषी यांनी म्हटले आहे. खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

हेही वाचा: Phir Aayi Hasseen Dillruba : “जो पागलपन की हदसे ना गुजरे..”, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा दमदार ट्रेलर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकेश ऋषी यांनी ९० च्या दशकात धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला १९९२ साली प्रदर्शित झालेला हमला हा चित्रपट होता. त्यानंतर जिओ शान से हा १९९७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या न्यायदेवता आणि लोह पुरुष या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मुकेश ऋषी यांनी आमिर खान, मिथून चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, सनी देओल या अभिनेत्यांबरोबर अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे.