ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर लवकरच आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात दिसणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना ‘स्ट्रगलिंग आर्टिस्ट’ म्हणजेच संघर्ष करणाऱ्या कलाकारांबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, उद्योगपती मुकेश अंबानी हे देखील स्ट्रगलर आहेत.

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

कलाकारांच्या अभिनय क्षेत्रातील संघर्षाबद्दल विचारलं असता अन्नू कपूर ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मला या जगातली एक व्यक्ती दाखवा जी संघर्ष करत नाही. संघर्ष हा फक्त पैसा आणि प्रसिद्धीचा असतो असे तुम्हाला वाटतं, पण जर तुम्ही मुकेश अंबानींना विचाराल तर, तेही संघर्षच करत आहेत, तेही स्ट्रगलर आहेत.”

शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”

अन्नू कपूर गेल्या ४० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. पण तरीही आयुष्यात संघर्ष आहेच, असं त्यांनी म्हटलंय. “चित्रपटसृष्टीत ४० वर्षांनंतरही प्रत्येक भूमिका माझ्यासाठी आव्हान असते. दुर्दैवाने, मी अशा विशेष लोकांपैकी नाही ज्यांना सहज यश मिळाले. मला माझ्या यशाचा वाटाही मिळाला नाही, माझ्यापर्यंत गोष्टी सहजासहजी आल्या नाहीत. माझ्या कामाचे कौतुक करणाऱ्यांचा मी आभारी आहे. पण मी एक स्ट्रगलर आहे आणि कायम राहणार आहे,” असं ते ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, परदेशात सुट्टीवर गेली असताना घडली घटना

दरम्यान, आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.