scorecardresearch

‘भीड’ चित्रपटातील भूमी पेडणेकरच्या बोल्ड सीनवरून दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले “हे सांगणं… “

भूमी पेडणेकरने याआधीदेखील बोल्ड सीनबद्दल भाष्य केलं होतं

bhumi pednekar final
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कामाप्रमाणे ती तिच्या वक्तव्यांमुळे ही सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तिचा विचार ती अगदी स्पष्टपणे मांडताना दिसते. तिला आलेले अनुभव तिला न पडणाऱ्या गोष्टी यांबद्दल ती तिचे विचार उघडपणे मांडते. लस्ट स्टोरीजमधील बोल्ड सीन्समुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. आता तिच्या आगामी चित्रपटातदेखील बोल्ड सीन असणार आहे त्याबद्दलच तिने भाष्य केलं आहे.

सामाजिक विषयांवर भाष्य करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता आणखीन एका नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘भीड’, या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभव सिन्हा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूमी पेडणेकरचं कौतुक केलं आहे. त्यांनी सांगितले की चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी भूमी पेडणेकरचा इंटिमेट सीन चित्रित करायचा होता.

“बटाट्याची भाजी, पुरणपोळी अन्…” गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने अस्सल मराठमोळ्या पदार्थांवर मारला ताव

ते पुढे म्हणाले, “आम्ही एक सीन चित्रित करत होतो, तो एक इंटिमेट सीन होता आणि तो शूटचा पहिला दिवस होता आणि लगेच मला कल्पना सुचली. ज्या खोलीत चित्रीकरण होणार होते ती खोली छोटी होती, त्यामुळे जागा नव्हती. तर मी दुसऱ्या खोलीतून मॉनिटरकडे बघत होतो. कॅमेरा रोल करणार इतक्यात मी भूमीला काहीतरी सांगितले, जे आता सांगणे कठीण आहे.” नेमकं तिला काय सांगितले याबद्दल ते म्हणाले, “ते सांगणे खूप कठीण आहे, इथे त्याचा उल्लेख करू शकत नाही.” त्यांनी ऍक्शन म्हंटल्यावर भूमीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती केली.

या चित्रपटात भूमीबरोबरच राजकुमार राव व आशुतोष राणाच, दिया मिर्झा, पंकज कपूर, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट २४ मार्चला देशभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:54 IST

संबंधित बातम्या