बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अनुपम खेर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतात. मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त मुख्य ज्युरींनी केलेल्या टीकेमुळे ‘द काश्मीर फाइल्स’ पुन्हा चर्चेत आला आहे. अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं.

अनुपम खेर यांनी नुकतीच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव शेअर केला. मुलाखतीत पत्रकाराने काश्मीर फाइल्स चित्रपटातील तंबूबाहेर वृद्ध व्यक्ती बिस्किट खात असतानाच्या अनुपम खेर यांच्या सीनबाबत प्रश्न विचारला. चित्रपटातील या सीनबद्दल अनुभव व्यक्त करताना अनुपम खेर भावूक झाले.

हेही वाचा>> “माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट

‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील त्या सीनच्या चित्रिकरणाची आठवण शेअर करत ते म्हणाले, “द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचं शूटिंग करताना कोणत्याही सीनबाबत तो चित्रीत व्हायच्या आधी मी विचार केलेला नव्हता. काश्मीर पंडितांची शोकांतिका मांडण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे ते पडद्यावर योग्य प्रकारेच सादर झालं पाहिजे. म्हणूनच चित्रपटातील माझ्या भूमिकेचं नावही वडिलांच्या नावावर आहे. काश्मीर फाइल्स चित्रपटाचे शूटिंग करताना २५ दिवस मी ‘पुष्करनाथ’ बनलो होतो. मी माझ्यातील अभिनेत्याला त्यात डोकावू दिलं नाही”.

हेही वाचा>> “इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत

“काश्मीर फाइल्स चित्रपटातील प्रत्येक सीन चित्रीत झाल्यानंतर आम्ही खूप रडायचो. जेव्हा चित्रपटातील त्या सीनबाबत मला विवेक अग्निहोत्रींनी सांगतिलं, तेव्हा तो सीन कसा करायचा हा विचार मी केला नव्हता. तंबूमधून बाहेर पडल्यानंतर बिस्किट खायचं आहे. तुझ्या मागे एक महिला रडत आहे, एवढंच मला सांगण्यात आलं होतं. या सीनसाठी मी १८ तास जेवण केलं नव्हतं. कारण भूक काय असते, हे मला जाणून घ्यायचं होतं”, असंही पुढे अनुपम खेर यांनी सांगितलं.

हेही वाचा>> सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे भावूक होत ते म्हणाले, “सीन चित्रीत झाल्यानंतर मी फाइव्ह स्टार हॉटेमध्ये गेलो. मी अंघोळ केली. पण नंतर विचार आला, ज्या वृद्ध व्यक्तीची भूमिका मी साकारली, ती व्यक्ती तर त्याच अवस्थेत राहिली असेल. त्या सीनमध्ये मी स्वत:ला मारलंही आहे. हे मी सीन चित्रीत व्हायच्या आधी ठरवलं नव्हतं. त्यामुळे काश्मीर फाइल्सबाबत कोणी चुकीचं वक्तव्य केलं की मला राग येतो”.