scorecardresearch

“इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत

प्रथमेश परबने सिद्धार्थ जाधवच्या बालभारती चित्रपटासाठी शेअर केली खास पोस्ट

“इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत
प्रथमेश परबने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे.(फोटो: प्रथमेश परब/ इन्स्टाग्राम)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘टाइमपास’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळविलेल्या प्रथमेश ‘टकाटक’, ‘उर्फी’, ‘बीपी’, ‘एक नंबर’ अशा चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतंच प्रथमेश अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटातही झळकला.

प्रथमेशने अभिनेता सिद्धार्थ जाधवचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बालभारती’ हा चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट लिहिली आहे. ‘बालभारती’ चित्रपटातील कलाकारांबरोबरचे फोटो शेअर करत प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रथमेशने “’बालभारती’…आपल्या सिद्धूचा आपला सिनेमा. ‘आपला’ याच्यासाठी कारण यामध्ये मांडण्यात आलेल्या विषय अगदी जवळचा. आजूबाजूला खूप लोक असतात जे तुम्हाला इंग्रजी या भाषेवरून जज करत असतात…इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे…पण त्यापेक्षा समोरचा माणूस काय बोलतोय हे जास्त महत्त्वाच आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”

पुढे त्याने “मराठी शाळांचं कमी होणार प्रमाण आपण कसं वाढवू शकतो याच्यावरही खूप सोपा उपाय या सिनेमात मांडला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा वाटला. सिद्धू दादा आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हा सिनेमा थेटरमध्ये जाऊन बघा”, असंही म्हटलं आहे. प्रथमेशने बालभारती सिनेमा पाहिल्यानंतर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा>> “तुमच्या शरीराची ठेवण…” बोल्ड फोटो शेअर करत प्राजक्ता माळीने दिला हटके सल्ला

हेही वाचा>>Video: घोड्यावर बसून वाजत गाजत आली राणादाची वरात; लग्न मंडपाच्या बाहेरच वऱ्हाडी मंडळींसह हार्दिकचा तुफान डान्स

सिद्धार्थ जाधवचा ‘बालभारती’ चित्रपट २ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धार्थसह नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, संजय मोने, उशा नाईक, आर्यन हे कलाकारही झळकले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 08:47 IST

संबंधित बातम्या