आज जग फ्रेंडशिप डे साजरा करत आहे. अनेक जणांनी आपल्या जिवलग मित्रांसाठी खास पोस्ट शेअऱ केली आहे. यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांचाही समावेश आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी फ्रेंडशिप डे निमित्त त्यांचे खास मित्र दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- Video : “हृदयाला दोन छिद्रं, सहा तास शस्त्रक्रिया अन्…” बिपाशा बासूने सांगितला लेकीचा संघर्षमय प्रवास, म्हणाली “ती तीन महिन्यांची…”

अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील पहिल्या फोटोत अनुपम खेर अनिल कपूरबरोबर दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांच्याबरोबर सतीश कौशिक दिसत आहेत. सूट-बूट आणि टाय परिधान केलेल्या तिन्ही कलाकारांमधील बॉन्डिंग फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अनुपम खेर यांनी या पोस्टबरोबर लिहिले ‘हॅप्पी फ्रेंडशिप डे! आज मला सतीशची खूप आठवण येतेय!’

अनुपम खेर आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवत होते. मात्र याच वर्षी ९ मार्च रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अनुपम खेर आणि अनिल कपूर हे दोघेही सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र आहेत. या तिघांनीही ‘राम लखन’ चित्रपटात एकत्र काम केले होते आणि तेव्हापासूनच तिघांची मैत्री घट्ट झाली.

हेही वाचा- “आताचे अभिनेते अंगावरचे केस…”, बॉलीवूडमधील बदलांविषयी सनी देओलने मांडले स्पष्ट मत; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपम खेर सतीश कौशिक यांची मुलगी वंशिकाच्या खूप जवळ आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात. दुसरीकडे, सतीश यांचे निधन झाल्यापासून, अनुपम विशेषतः वंशिकासोबत वेळ घालवतो आणि सतीश तिला जसा घेऊन जायचा तसाच तिला जेवणासाठी घेऊन जातो. सतीश कौशिक शेवटचे सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसले होते. तसेच ‘इमर्जन्सी’ आणि ‘गन्स अँड गुलाब’ या वेबसिरीजमध्येही त्यांची महत्वाची भूमिका आहे.