News : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा सध्या चर्चेत आहे. ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ चित्रपटाचे स्क्रिनिंग ते ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य यामुळे अनुराग पुन्हा चर्चेत आला. नुकतंच अनुरागच्या ‘केनडी’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग कान्समध्ये करण्यात आलं. राहुल भट आणि सनी लिओनी यांचा हा चित्रपट जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रपटगृह ‘Theatre Lumiere’ येथे दाखवण्यात आला.

या प्रसिद्ध चित्रपटगृहात ‘केनडी’ दाखवण्याबद्दल आणि त्याच्या सर्वात लोकप्रिय अशा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाबद्दल नुकतंच अनुरागने भाष्य केलं आहे. ‘ब्रूट इंडिया’शी संवाद साधताना अनुराग म्हणाला, “मी फारच भावूक झालो आहे, या प्रसिद्ध चित्रपटगृहात दाखवला जाणारा हा माझा पहिला चित्रपट आहे, तब्बल २५०० लोक माझ्या या चित्रपटाची प्रशंसा करत होते. माझा ‘ऑलमोस्ट लव्ह विथ डिजे मोहब्बत’ जेवढ्या लोकांनी पाहिला त्यांच्या मानाने ही संख्या फार मोठी आहे. एकाच स्क्रिनिंगमध्ये मी हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.”

आणखी वाचा : “चित्रपटात किसिंग सीन…” अभिनेत्री सोनम बाजवाचा बोल्ड सीन्सबद्दल मोठा खुलासा

याच मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या कल्ट क्लासिक चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’बद्दल विचारण्यात आलं तेव्हा मात्र अनुरागकडून वेगळंच उत्तर ऐकायला मिळालं. याबद्दल तो म्हणाला, “गँग्स ऑफ वासेपूर हा माझ्या आयुष्याला मिळालेला शाप आहे. मला त्या चित्रपटाबद्दल एक अढी मनात निर्माण झाली आहे, कारण सगळ्यांना मी त्याच धाटणीचा चित्रपट करेन अशी अपेक्षा आहे. असा चित्रपट मी माझ्या उभ्या आयुष्यात पुन्हा कधीच करणार नाहीये. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ नेटफ्लिक्सवर कायमच उपलब्ध असणार आहे. मला आता पुढे जायचं आहे आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट करायचे आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘केनडी’च्या आधी अनुरागचा हाच ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपट कान्स महोत्सवासाठी गेला होता. त्यावेळी मात्र तो चित्रपट कान्समधील वेगळ्या सेक्शनमध्ये म्हणजेच ‘डायरेक्टर्स फोर्टनाइट’मध्ये दाखवण्यात आला होता. आता प्रेक्षकांना अनुरागच्या या ‘केनडी’बद्दल उत्सुकता आहे. हा चित्रपट भारतात कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल अजून खुलासा झालेला नाही.