अनुराग कश्यप भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यंदाच्या कान्स मोहोत्सवात त्याच्या ‘केनेडी’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘नो स्मोकिंग’, ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘देव डी’पासून ते ‘रमन राघव २.०’, ‘गुलाल’ आणि ‘मनमर्जियां’ यांसारखे अनुराग कश्यपचे चित्रपट चांगलेच गाजले. दरम्यान अनुरागने अभिनेत्री आलिया भट्टबाबत एक विधान केलं आहे. या विधानाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

हेही वाचा- “ज्याच्याबरोबर भविष्याची स्वप्न पाहिली तोच जोडीदार…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या ब्रेकअपवर २० वर्षांनी विवेक ओबेरॉयने सोडलेलं मौन

अलीकडेच त्याने आलिया भट्टला ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जिंकल्याबद्दल अभिनंदन केले होते. इतकंच नाही तर तो आलियाला भारतातील सर्वोत्तम अभिनेत्रीही मानतो. पण एका मुलाखतीत मी आलियाबरोबर कधीही काम करु शकणार नाही असं विधान अनुरागने केलं आहे. अनुरागने यामागचं कारणही सांगितल आहे.

हेही वाचा- पती राज कुंद्राच्या बायोपिकमध्ये शिल्पा शेट्टी करणार काम? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली…

अनुराग म्हणाला “आलिया आपल्या देशाची सर्वोत्तम कलाकार आहे. जेव्हा जेव्हा मला तिचे काम आवडते तेव्हा मी तिला फोन करून तिचं कौतुक करतो. मला आलियाबरोबर काम करायचे आहे पण माझ्या चित्रपटांचे बजेट कमी आहे. अशा परिस्थितीत मला ते परवडणार नाही. मी कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचा एकापेक्षा जास्त वेळा पाठलाग करत नाही. जर त्यांना माझ्यासोबत काम करण्याचा विचार करावा लागत असेल तर मी हे प्रकरण तिथेच संपवतो.”

हेही वाचा- “‘कहो ना प्यार है’मधून राकेश रोशन यांनीच करीनाला बाहेरचा रस्ता दाखवलेला कारण…”, अमीषा पटेलचा मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाला नुकतेच गंगूबाई काठियावाडीसाठी ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.