Anushka Sharma & Priyanka Chopra Argued On Dil Dhadakne Do set : अनुष्का शर्मा व प्रियांका चोप्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. दोघींनीही आजवर अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या दोघींनी ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता यातील अभिनेत्यानंच सेटवरील दोघींमध्ये झालेल्या भांडणाबद्दल सांगितलं आहे.

अनुष्का शर्मा व प्रियांका चोप्रा यांनी जोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. त्यामध्ये अभिनेता दर्शन कुमारनंही काम केलेलं. अशातच आता त्यानं ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का व प्रियांका यांच्याबद्दल सांगितलं आहे. दर्शननं अनुष्काबरोबर ‘NH10’मध्ये काम केलेलं. त्यासह त्यानं ‘मेरी कॉम’मध्ये प्रियांकाबरोबरही काम केलेलं. त्यामध्ये त्यानं प्रियांकाच्या नवऱ्याची भूमिका साकारलेली.

अनुष्का शर्मा व प्रियांका चोप्रामध्ये ‘या’ अभिनेत्यामुळे झालेला वाद

प्रियांका व अनुष्काबद्दल दर्शन मुलाखतीत म्हणाला, ” ‘दिल धडकने दो’च्या शूटिंगसाठी त्या दोघी भेटल्या होत्या. तेव्हा प्रियांका माझ्याबद्दल अनुष्काला म्हणाली की, दर्शन खूप गोड, मेहनती व चांगला अभिनेता आहे. पण, अनुष्का म्हणाली की, मी त्याच्यापेक्षा असभ्य माणूस आजवर पाहिलेला नाही. त्यांच्यामध्ये माझ्यामुळे वाद झाला. त्या दोघींबरोबर मीसुद्धा तेव्हा माझ्या भूमिकेतच होतो. मी सतबीर ही भूमिका साकारत होतो. मी अनुष्काला भेटलोच नाही क्लायमेक्सनंतर मी तिला माझी ओळख करून दिली.”

दर्शन पुढे म्हणाला, “तो माझ्या कामाचा भाग होता. तिला याबद्दल कदाचित काहीच कल्पना नव्हती. म्हणून तिला माझ्यामध्ये माज आहे, असं वाटलं असेल. नंतर जेव्हा मी तिला चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिल्लीत भेटलो तेव्हा तिचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आणि तिला वाटलं की, मी खूप चांगला आहे. तेव्हा मी तिला सांगितलं की, मी भूमिकेत असल्यानं तुझ्याशी तेव्हा बोलता आलं नाही.”

दरम्यान, अनुष्का शर्मा व प्रियांका चोप्रा यांचा ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला. त्यामध्ये त्यांच्यासह रणबीर सिंहही झळकलेला. परंतु, माध्यमांच्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी करीना कपूर, कतरिना कैफ, रणबीर कपूर व हृतिक रोशन यांना पहिली पसंती होती.