अभिनेत्री अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारी रोजी अकायला जन्म दिला. दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी जानेवारी महिन्यात विराट-अनुष्का लंडनला रवाना झाले होते. कुटुंबाला वेळ देण्यासाठी कोहलीने कसोटी सामन्यांमधून काही काळ ब्रेक घेतला होता. लेकाच्या जन्मानंतर आणि आयपीएलच्या निमित्ताने मार्च महिन्यात विराट कोहली एकटा भारतात आला. यावेळी चाहत्यांसह पापाराझींनी त्याच्याकडे अनुष्काबद्दल विचारपूस केली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री दोन्ही मुलांसह लवकरच भारतात परतणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अनुष्का शर्मा तिची दोन्ही मुलं वामिका आणि अकायबरोबर भारतात परतली आहे. यासंदर्भात ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून माहिती देण्यात आली आहे. शिवाय अनुष्काने पापाराझींना अकायसह वामिकाची झलक दाखवल्याचा दावा सुद्धा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचा : Salman Khan House Firing : सलमानच्या घराची रेकी करणाऱ्या संशयितांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर तीन वर्षांनी अनुष्काने वामिकाला जन्म दिला. लेकीचा जन्म झाल्यावर तिचे कोणीही फोटो काढू नयेत असा अनुष्काचा कायम आग्रह होता. तिची हीच अट यापुढे सुद्धा कायम राहणार आहे. पापाराझींनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माने लेक अकायची झलक विमानतळावर पापाराझींना दाखवली. तसेच “लवकरच निवांत आणि जेव्हा माझी मुलं माझ्याबरोबर नसतील तेव्हा मी फोटोसाठी पोज देईल.” असं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

हेही वाचा : नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पूजा सावंतची रोमँटिक पोस्ट, सिद्धेशला ‘या’ नावाने मारते हाक, कॅप्शनने वेधलं लक्ष

अनुष्काने दोन्ही मुलांचे फोटो काढू नयेत अशी विनंती पापाराझींना केली होती. तसेच लवकरच सर्वांसाठी एका पार्टीचं आयोजन करणार असल्याचंही तिने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर २०१७ मध्ये विराट-अनुष्काने लग्नगाठ बांधली होती. दोघेही पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. आता सर्वत्र विराट-अनुष्काच्या दुसऱ्या बाळाची म्हणजेच अकायची चर्चा चालू आहे. आता अनुष्का IPL मॅचसाठी मैदानात उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.