Arbaaz Khan And Sshura Khan Reveal Their Newborn Daughter’s Name : लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान वयाच्या ५८ व्या वर्षी नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची दुसरी पत्नी शुरा खानने ५ ऑक्टोबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. चिमुकलीच्या जन्मानंतर सध्या खान कुटुंबीयांच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अरबाज व शुराच्या लाडक्या लेकीची भेट घेण्यासाठी सलमान खान सुद्धा दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात पोहोचला होता.
आता शुराला डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णालयातून घरी जाताना अरबाजसह त्याच्या चिमुकल्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. या जोडप्याने लेकीच्या जन्मानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट देखील शेअर केली आहे. यात चिमुकलीचं नाव काय ठेवलंय याचा खुलासा करण्यात आला आहे.
अरबाज व शुरा खान यांनी त्यांच्या चिमुकल्या लेकीचं नाव ठेवलं आहे सिपारा खान. या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अरबाज खानचं पहिलं लग्न मलायका अरोराशी झालं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर त्यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये अरबाजने शुरा खानशी लग्न केलं. या दोघांच्या वयात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे. दरम्यान, शुराला मुलगी झाल्यावर अरबाज-मलायकाचा मुलगा अरहान खानदेखील शुराला भेटायला रुग्णालयात गेला होता.
शुरा खान कोण आहे?
अरबाजची दुसरी पत्नी शुरा खान ही मेकअप आर्टिस्ट आहे. तिने रवीना टंडनबरोबर बरीच वर्षे काम केलं आहे. अरबाज-शुराचं लग्न २०२३ च्या अखेरिस झालं होतं. या दोघांच्या लग्नाला सलमान खान कुटुंबीय व बॉलीवूडचे मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. अरबाज-मलायकाचा मुलगा अरहान देखील या लग्नात हजर होता.