अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने कुटुंबीय व मोजक्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत शुरा खानशी लग्नगाठ बांधली आहे. अरबाजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली. त्याच्या लग्नातील काही फोटोंमध्ये अभिनेत्री रवीना टंडन व तिची लेक राशा थडानीदेखील दिसत आहेत. रवीना व शुरा खानचं कनेक्शन नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

अरबाज खान व शुरा खानचे लग्न अर्पिता खानच्या घरी झाले. या लग्नाला खान कुटुंबियांसह मोजकेच पाहुणे हजर होते. त्यामध्ये रितेश देशमुख, त्याची पत्नी जिनिलीया व दोन मुलं होती. तसेच रवीना टंडन मुलगी राशा व मुलगा रणबीर थडानीबरोबर हजर राहिली. रवीनाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत अरबाज व शुरा यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओत ती अरबाजबरोबर डान्स करताना दिसत आहे.

Video: अरबाज खानचं दुसरं लग्न होत असताना मलायका अरोरा कुठे होती? समोर आला व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवीना टंडन अरबाज खानची चांगली मैत्रीण आहेच, पण याशिवाय तिचं शुराशी कनेक्शन आहे. शुरा खान ही बॉलीवूडमधील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटींबरोबरचे फोटो आहेत. त्यामध्ये रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांच्याबरोबरच्या फोटोंचा समावेश आहे. शुराने रवीना व राशाबरोबर बरंच काम केलं आहे.