Arijit Singh Opens Restaurant: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग हा त्याच्या आवाजासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याच्या गाण्याचे चाहते आहेत. आता अरिजीत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

अरिजीत सिंगने सुरू केले रेस्टॉरंट

अरिजीत सिंगने एक नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. इन्स्टंट बॉलीवूडने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की अरिजीत सिंगने एक रेस्टॉरंट सुरू केले असून हे सामान्य लोकांसाठी आहे. हेशेल असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. हे रेस्टॉरंट पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जियागंज येथे आहे. हे अरिजीत सिंगचे मूळ गाव आहे. असे म्हटले जात आहे की या रेस्टॉरंटमध्ये सर्वसामान्यांना ४० रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हेशेलचा बंगालीमध्ये स्वयंपाकघर असा अर्थ होतो. सामान्य लोकांना घरच्या पद्धतीने जेवण मिळावे, यासाठी हे रेस्टॉरंटची सुरुवात केली आहे. त्यामुळेच, जेवणाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड न करता ही किंमत कमी ठेवली आहे. तर काही रिपोर्टनुसार, ४० रुपयांत जेवण हे तेथील विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रत्येकासाठी ही सोय केली नाही. अरिजीत सिंगने यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. हे रेस्टॉरंट अरिजीतचे वडील चालवतात.

इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी अरिजीत सिंगचे कौतुक केले आहे. तो दयाळू असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “तो खूप चांगला आहे. त्याला खूप यश मिळू दे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आम्ही अरिजीत सिंगला पाठिंबा देतो”, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी अरिजीतचे कौतुक केले आहे.

अरिजीत सिंगच्या कामाबद्दल बोलायचे तर मेट्रो इन दिनों या चित्रपटातील गाणी गाणार आहे. अरिजीत फक्त हिंदी गाणीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक गाणी गाताना दिसतो. याबरोबरच, पंजाबी तसेच बंगाली गाण्यांसाठी अरिजीत प्रसिद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरिजित सिंहची अनेक गाणी जगभर प्रसिद्ध आहेत. ‘बंधेया रे बंधेया’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘तेरा यार हूँ मैं’, ‘लूट पूट गया’, ‘सोलमेट’, ‘गलती से मिस्टेक’, ‘सजनी’, ‘ओ माही’ अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत.