The Ladykiller Trailer: प्रत्येक चित्रपटात सारखाच अभिनय केल्याने सतत ट्रोल होणारा अर्जुन कपूर हा पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी कारण मात्र वेगळं आहे. अर्जुन कपूर व भूमी पेडणेकरचा ‘द लेडीकिलर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याबद्दल चर्चा होत आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

एका छोट्या शहरातील तरुण एका महाराजांच्या शोधात त्यांच्या जुन्या आलीशान बंगल्यामध्ये येतो, तेव्हा एक तरुणी त्याचं स्वागत करते, त्यानंतर त्यांच्यातील रोमॅंटिक केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते अन् हळूहळू त्या तरुणीचं खरं रूप समोर यायला सुरुवात होते आणि एकूणच हे कथानक भयावह वळण घेतं हे आपल्याला ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : व्हिडीओच्या माध्यमातून कंगना राणौतने प्रेक्षकांना केली ‘तेजस’ पाहायची विनंती; नेटकरी ट्रोल करत म्हणाले…

या ट्रेलरवरुन हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असल्याचं स्पष्ट होत आहे. यामध्ये अर्जुन कपूर व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यामध्ये या दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत आहे. याबरोबरच या दोघांमध्ये बरेच बोल्ड सीन्स आणि कीसिंग सीन्सही असल्याचं ट्रेलरमध्येच स्पष्ट होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसिकदृष्ट्या हा चित्रपट फारच थकवणारा असल्याचं अर्जुन कपूरने सांगितलं. पीटीआयशी संवाद साधताना तो म्हणाला, “हे एक वेगळाच चित्रपट आहे. मी या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी आणि भूमीसाठीही हा चित्रपट फारच डार्क आहे. यासाठी मी या चित्रपटानंतर तातडीने सुट्टीवर गेलो. सलग ४५ दिवस या चित्रपटासाठी शूटिंग केल्यावर मी मानसिकदृष्ट्या फार दमलो, मला त्या पात्रातून बाहेर यायचं होतं म्हणून मी लगेच सुट्टीवर गेलो.”

‘द लेडीकिलर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘बीए पास’, ‘सेक्शन ३७५’सारखे चित्रपट देणाऱ्या अजय बेहल यांनी केलं आहे. ३ नोव्हेंबरपासून हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.