१९७३ साली आलेल्या ‘बॉबी’ चित्रपटातील एका सीनमध्ये दिवंगत ऋषी कपूर यांनी आपले नितंब दाखवले होते. ७० च्या दशकात एखाद्या अभिनेत्याने इतका बोल्ड सीन देणं ही खूप मोठी गोष्ट होती. या चित्रपटात ऋषी यांच्याबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी हा सीन करण्यास नकार दिला होता.

ऋषी कपूर यांच्याबरोबर हा सीन करण्याची लाज वाटत होती, असं अरुणा इराणी यांनी सांगितलं. ऋषी कपूर यांचे वडील आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज कपूर यांनी अरुणाला हा सीन शूट करण्यास तयार केलं आणि ऋषी कपूर यांच्याकडे न पाहण्याचा सल्ला दिला. अरुणा यांनी नकार का दिला होता? याचं कारण ऋषी कपूर यांनीही विचारलं होतं. नेमकं काय घडलेलं? ते जाणून घेऊयात.

अरुणा इराणींनी दिलेला नकार

लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत अरुणा म्हणाल्या की आधी त्या हा सीन करायला तयार नव्हत्या, पण राज कपूर यांनी योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. “मी सुरुवातीला नकार दिला होता. ते (ऋषी कपूर) नग्नावस्थेत येतात आणि टॉवेलने केस पुसतात. त्यांनी तो शॉट दिला. मी राजजींना सांगितलं की मी ते करू शकत नाही. ते म्हणाले, ‘तिकडे पाहू नकोस, चुकीच्या गोष्टी पाहू नको, योग्य गोष्टींकडे पाहा’. शेवटी मी तेच केलं,” असं अरुणा इराणी यांनी नमूद केलं.

अरुणा इराणींनी सांगितलं की नंतर ऋषी कपूर यांनी नकारामागचं कारण विचारलं होतं. अरुणा म्हणाल्या, “मी तेव्हा रवी मल्होत्राच्या चित्रपटात चिंटूजींबरोबर काम करत होतो. ते म्हणाले, ‘अरुणाजी, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही त्या सीनबद्दल खूप आक्षेप घेतला होता, पण नग्न तर मला व्हायचं होतं, तुम्ही का आक्षेप घेत होता?”

ऋषी कपूर यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, असं अरुणा इराणींना वाटलं. “मी त्यांना सांगितलं की मला लाज वाटत होती. ते म्हणाले, ‘मी सीनचा विचार करत होतो, पण मी नग्न होतो, त्याची तुम्हाला का लाज वाटत होती?’ असं चिंटूजी म्हणाले. त्यांचं म्हणणं बरोबर होतं,” असं अरुणा इराणी म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषी कपूर यांचा ‘बॉबी’ हा चित्रपट एका श्रीमंत मुलाचा आणि एका गरीब मुलीचा प्रेमकथेवर आधारित होता. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. त्यात डिंपल कपाडिया, प्रेम चोप्रा आणि प्रेम नाथ देखील होते. हा रोमँटिक चित्रपट १९७३ चा सर्वाधिक कमाई करणारा आणि भारतीय चित्रपट होता.