scorecardresearch

प्रमोशनसाठी कुठेच न फिरता शाहरुख खानच्या ‘पठाण’ने इतके कोटी कसे कमावले? अभिनेता म्हणतो, “वाघ कधीच…”

‘पठाण’ चित्रपटाने प्रमोशन न करताही कोट्यवधी रुपये कसे कमावले? शाहरुख खानने दिलं उत्तर

shahrukh khan reply shahrukh khan
‘पठाण’ चित्रपटाने प्रमोशन न करताही कोट्यवधी रुपये कसे कमावले? शाहरुख खानने दिलं उत्तर

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होताच किंग खानच्या चाहत्यांनी देशभरात जल्लोष साजरा केला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. प्रदर्शनाच्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने जगभरात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. शाहरुखही चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून भारावून गेला आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ने आतापर्यंत कमावले इतके कोटी, चित्रपटाची कमाई पाहून अभिनेता म्हणतो, “आता पुन्हा…”

शाहरुखने नुकतंच ट्वीटरद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतलं. या सेशनद्वारे चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने शाहरुखला एक वेगळाच प्रश्न विचारला.

“कोणतंच प्रमोशन न करता तसेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोणतीच मुलाखत न देता ‘पठाण’ चित्रपट बक्कळ कमाई करत आहे.” असं एका चाहत्याने शाहरुखला म्हटलं. यावर शाहरुखने अगदी त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं. शाहरुखने चोख उत्तर देत सगळ्यांची मनं जिंकली.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “तो भारताचा…”

शाहरुख म्हणाला, “मी विचार केला की वाघ कधीच मुलाखत देत नाही. म्हणून यावेळी मीही मुलाखत दिली नाही. आता फक्त जंगलात येऊन तर बघा”. शाहरुखच्या या उत्तराचं सगळेच जण कौतुक करत आहेत. तर चाहत्यांनी शाहरुखला त्याने दिलेल्या उत्तराबाबत तू आमचं मन जिंकलस असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:23 IST
ताज्या बातम्या