अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल आई-बाबा झाले आहेत. बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथियाने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अथिया व राहुल यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चिमुकल्या सदस्याच्या आगमनाबद्दल माहिती दिली आहे.

केएल राहुल व अथिया शेट्टी यांनी लग्नानंतर दोन वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. अथिया शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. आज (२४ मार्च रोजी) या जोडप्याच्या घरी लक्ष्मी आली. Blessed With A Baby Girl असं लिहिलेली पोस्ट अथिया व तिच्या पतीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अथियाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच इंडस्ट्री व क्रीडा विश्वातील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीती चोप्रा, मृणाल ठाकूर, मसाबा गुप्ता, क्रिती सेनॉन, कियारा अडवाणी, मलायका अरोरा, शनाया कपूर, आयशा श्रॉफ, सोफी चौधरी, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ यांनी अथिया व केएल राहुल यांचं अभिनंदन केलं आहे.

पाहा पोस्ट

अथिया शेट्टी व केएल राहुल यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोन वर्षांपूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील व सिनेइंडस्ट्रीतील काही मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. लग्नाला दोन वर्षे पूर्ण होताच या जोडप्याने आनंदाची बातमी शेअर केली आहे. अथिया व केएल राहुल आता एक गोंडस लेकीचे आई-बाबा झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अथिया शेट्टीने ८ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ती आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. ‘आमचा सर्वात सुंदर आशीर्वाद २०२५ मध्ये येणार आहे,’ असं कॅप्शन देत अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. आज दोघांनी एक सुंदर पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली.