Actress Athiya Shetty- KL Rahul Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल आज लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. दोघेही खंडाळा येथील सुनील शेट्टींच्या बंगल्यावर लग्न करतील. त्यांच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जवळचे नातेवाईक आणि काही सेलिब्रिटींचा समावेश असेल. पण, त्यांच्या लग्नानंतर मोठ्या रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे.

Athiya Shetty-KL Rahul च्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर; सलमान-शाहरुखसह ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन आयोजित केलं जाईल. आज २३ जानेवारीला लग्नगाठ बांधल्यानंतर हे जोडपं मुंबईत लग्नाचं रिसेप्शन देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सोहळ्याला जवळपास ३ हजार पाहुणे उपस्थित राहतील. रिसेप्शन सोहळ्यात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर राजकारणी आणि काही टॉप बिझनेसमननाही निमंत्रित करण्यात आलं आहे.

Video: Athiya Shetty-KL Rahul च्या संगीत सोहळ्यात शाहरुखच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकले पाहुणे, पाहा व्हिडीओ

अथिया आणि केएल राहुल आज दुपारी ४ वाजता खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न करतील. त्यानंतर ते माध्यमांसमोर येतील. सध्या पाहुणे फार्म हाऊसवर पोहोचत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नाला फक्त १०० पाहुणेच असतील. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न होत असल्याने ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करून सर्वांना निमंत्रित केलं जाईल.

‘आज की पार्टी मेरी तरफ से’! Athiya Shetty-KL Rahulच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अथिया व राहुल २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही जाहीरपणे नात्याची कबुली दिली होती, त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज दोघेही विवाहबद्ध होत आहेत.