अथिया शेट्टी व केएल राहुल अखेर २३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाची खूप दिवसांपासून चर्चा होती. लग्न पार पडल्यानंतर दोघांनी फोटो शेअर केले. तसेच फार्म हाऊसमधून बाहेर येत माध्यमांना पोजही दिल्या. दोघेही लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अथिया व राहुलवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

फक्त ४ चित्रपटांत दिसलेली अथिया शेट्टी आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिची व केएल राहुलची एकूण संपत्ती किती?

अथिया व राहुलच्या लग्नाच्या कपड्यांनी चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. दोघांनी साधे पण डिझायनर कपडे लग्नासाठी पसंत केले होते. अथिया शेट्टीने अनामिका खन्नाने डिझाईन केलेला पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. डिझायनरने खूप मेहनत घेत हा लेहेंगा डिझाईन केला व तो बनवून घेतला होता. अथियाचा लेहेंगा पूर्णपणे हाताने बनवलेला, हाताने विणलेला होता. त्यावर जरदोजी आणि जाळी वर्कसह सिल्कचे वर्क होते. तर, तिचे ब्लाऊज आणि दुपट्टा सिल्क ऑर्गन्झाचा बनलेला होता. हा सुंदर लग्नाचा लेहेंगा तयार करण्यासाठी जवळपास १० हजार तास लागले होते, म्हणजे तब्बल ४१६ दिवसांच्या मेहनतीनंतर हा लेहेंगा तयार झाला होता, असं वृत्त ‘पिंकव्हिला’ने दिलंय.

पेस्टल लेहेंग्याबरोबर एक मोठा हार, मॅचिंग कानातले, मांग टिका मोजक्याच दागिन्यांनी अथियाने तिचा लूक पूर्ण केला. याशिवाय तिने इतर कोणतेही दागिने घातले नव्हते. अथियाच्या नाजूक कलीरा (हातात घालण्यात येणारा दागिना) यांनीही लक्ष वेधून घेतलं.

KL Rahul-Athiya Shetty यांचं लग्न झालं; रिसेप्शनबद्दल सुनील शेट्टींनी दिली माहिती, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरदेव राहुलने हलके नक्षीकाम असलेली शेरवानी व दुपट्टा कॅरी केला होता. दोघांनी लग्नात अगदी सिंपल लूक केला होता. या लूकमध्ये दोघेही अत्यंत सुंदर दिसत होते.