दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन्ड्री’, ‘नाळ’, ‘सैराट’ या चित्रपटांचे खूप कौतुक झाले. त्याचबरोबर त्यांच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. प्रेक्षक नेहमीच त्यांच्या कामाचे कौतुक करतात. तर आता आयुष्मान खुरानाने नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाबद्दल त्याला काय वाटते हे सांगितले आहे.

आयुष्मान खुराना गेली अनेक वर्षे अभिनेता म्हणून, गायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आशयघन कलाकृतींमध्ये काम करणे किंवा अशा कलाकृती पाहणे त्याला खूप आवडते. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांची त्याला भुरळ पडली आहे. नुकतेच त्याने नागराज मंजुळे यांचे चित्रपट आवडतात, असा खुलासा करीत यामागचे कारणही सांगितले.

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले

आयुष्मानने नुकतीच ‘एबीपी माझा’च्या ‘महाकट्टा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी तो म्हणाला, “मला मराठी बोललेले समजते पण बोलता येत नाही. मी मराठी चित्रपट आवर्जून बघतो. नागराज मंजुळेचे चित्रपट मला फार आवडतात. त्यांचे चित्रपट हे मातीशी जोडलेले असतात, ते आपल्या समाजावर भाष्य करीत असतात. नागराज यांचे चित्रपट असे असल्याने मला ते खूप आवडतात.”

हेही वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता आयुष्मानचे हे बोलणे खूप चर्चेत आले आहे. दरम्यान, आयुष्मान लवकरच ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे आतापर्यंत अनेक टीझर प्रदर्शित झाले. या सर्व टीझर्सना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तरी या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसेल. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.