Baba Siddique Shot Dead : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. वांद्रे पूर्व येथील खेरवाडी सिग्नल परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर सर्व स्तरांतून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी यांची मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींशी घट्ट मैत्री होती. त्यामुळे त्यांच्या हत्येनंतर बॉलीवूडकरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या एन्काऊंटरची बातमी कळताच अनेक सेलिब्रिटी रात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते.

सलमान खान शनिवारी रात्री ‘बिग बॉस’च्या १८ व्या सीझनचं होस्टिंग करत होता. यादरम्यान त्याला बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याची बातमी समजली. यानंतर भाईजानने त्वरीत शूटिंग थांबवलं आणि तो लीलावती रुग्णालयाच्या दिशेने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दाखल झाला.

हेही वाचा : Baba Siddique – Video : बाबा सिद्दीकींची हत्या, सलमान खानची लीलावती रुग्णालयात धाव; Bigg Boss चं शूटिंग केलं रद्द

बाबा सिद्दीकी ( Baba Siddique) यांच्या हत्येबद्दल समजताच सर्वात आधी संजय दत्त लीलावती रुग्णालयात पोहोचला होता. या पाठोपाठ अभिनेत्री शिल्पा शेट्टी याठिकाणी दाखल झाली. तिच्याबरोबर तिचा पती राज कुंद्रा देखील यावेळी उपस्थित होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर शिल्पा शेट्टी प्रचंड भावुक होऊन तिला अश्रू अनावर झाल्याचं व्हायरल व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रिया दत्त, वीर पहारिया, सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बाल, झहीरचे वडील इक्बाल रतनसी हे सगळेजण शनिवारी मध्यरात्री लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. तर, काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घडलेल्या या धक्कादायक घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Baba Siddique Shot Dead : राजकारणातला अजातशत्रू! गोळीबारात ठार झालेले बाबा सिद्दीकी कोण होते?

हेही वाचा : Baba Siddique – बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान खान व शाहरुख खान यांच्यातील अनेक वर्षांचा वाद, नेमकं काय घडलं होतं?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाबा सिद्दीकींच्या ( Baba Siddique ) हत्येची बातमी समजल्यावर सलमान खानने बिग बॉसचं शूटिंग रद्द केलं आहे. याशिवाय या घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तिन्ही हल्लेखोर रिक्षाने घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.