महाराष्ट्रातील अनेक गावं पाणी टंचाईचा सामना करत आहेत. काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, तर काही ठिकाणी लोकांना चालत दूरवर जाऊन पाणी आणावं लागत आहे. पालघरमधील जव्हार इथेही पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. अशातच याठिकाणी पाण्याच्या सोय करण्यासाठी बाबिल खानने आर्थिक मदत केली आहे.

दिग्गज बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान आपल्या अभिनयाप्रमाणेच नम्रपणा व मदत करणाऱ्या स्वभावासाठी ओळखला जातो. अभिनेत्याने पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मुंबईजवळच्या एका गावासाठी आर्थिक मदत केली आहे. बाबिलने युट्यूबर प्रेम कुमारला ५० हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच त्याने प्रेम कुमारला चांगलं काम करत राहा, असं म्हणत प्रोत्साहन दिलं.

“आम्ही शेवटचे बोललो तेव्हा ते खूप…”, बेपत्ता गुरुचरण सिंग नैराश्यात असल्याबद्दल ऑनस्क्रीन मुलाची प्रतिक्रिया

बाबिलने इन्स्टाग्राम व युट्यूबवर ‘YouNick Viral Vlogs’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रेम कुमारला ५० हजार रुपयांची मदत केली. मुंबईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हे पैसै खर्च करण्यात येणार आहेत. ‘विरल भयानी’ने शेअर केलेल्या व्हिडीओत बाबिल फोनमधून पैसे ट्रान्सफर करताना दिसतोय. “माझं नाव लिहायची गरज नाही, तू चांगलं काम करतोय, ते करत राहा,” असं बाबिल पैसे ट्रान्सफर केल्यावर म्हणाला.

बेपत्ता गुरुचरण सिंगचं लग्न अन् आर्थिक अडचणींबाबत कुटुंबियांनी सोडलं मौन, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर प्रेम कुमारने कमेंट करत मदतीसाठी बाबिलचे आभार मानले. बाबिल खान, तुझ्या मदतीबद्दल आभार कसे मानू कळत नाही. तू केलेल्या ५० हजार रुपयांच्या मदतीमुळे आम्ही मुंबईजवळच्या या गावातील पाण्याची समस्या सोडवणार आहोत, असं म्हणते त्याने बाबिलचे कमेंट्स सेक्शनमध्ये आभार मानले. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून बाबिलचं कौतुक करत आहेत.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

दरम्यान बाबिल खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो अखेरचा ‘द रेल्वे मॅन’मध्ये दिसला होता. सध्या तो शूजित सरकारबरोबर एका चित्रपटाचं शूटिंग करत आहे.