Aman Yatan Verma Video : ‘बागबान’ अभिनेता अमन वर्मा २००० च्या दशकातील एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. ‘बागबान’मध्ये अमनने अमिताभ बच्चन यांच्या मोठ्या मुलाची भूमिका केली होती. आता अमनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मंचावर जादू करताना दिसत आहे. पोटापाण्याचा प्रश्न आहे, असं अमन म्हणाला.

अमन वर्माने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जादू करताना दिसत आहेत. अभिनेता वर्तमानपत्राच्या मागे शॅम्पेनची बाटली गायब करताना दिसतोय. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसतात. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिलं, “ठीक आहे, इथेच मी जादूगार बनण्याच्या युक्त्या शिकलो…ते थोडं कठीण होतं पण मी ते शिकलो. हा सगळा हातांचा खेळ आहे. बंधू आणि भगिनींनो, जादूगार येत आहे… ज्याचं नाव आहे अमन यतन वर्मा”

पाहा व्हिडीओ –

अमनने हा व्हिडीओ या आठवड्याच्या सुरुवातीला पोस्ट केला होता. हा व्हिडीओ जवळपास पाच लाख वेळा पाहिला गेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलं, ‘हे काय करतायत तुम्ही’. यावर उत्तर देताना अमन वर्मा म्हणाला, ‘हा पोटापाण्याचा प्रश्न आहे मित्रा, काय करावं’. दुसऱ्या एका युजरने लिहिलं, ‘इतक्या प्रतिभावान अभिनेत्याला काय काय करावं लागतंय? मला वाईट वाटतंय’,
त्याला अमन वर्मा म्हणाला, ‘हे माझं काम आहे. काम लहान मोठं नसतं. हे काम करायला मला किती रुपये मिळाले हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्या त्या असिस्टंटची जागा घ्याल, ज्याने मला बाटली आणून दिली होती.’

अमन वर्माने पोटा-पाण्यासाठी हे करावं लागतंय, असं म्हटल्याने त्याने काम मिळत नसल्याने कदाचित हे काम करणं निवडलं असावं असं वाटत होतं. पण नंतर त्याने एचटीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की तो जादूगर झालेला नाही. त्याने एका चित्रपटासाठी हे सगळं केलं आहे.

अमन वर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘पचपन खम्भे लाल दीवारें’ मधून १९९५ मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट व मालिका केल्या होत्या. ‘खुलजा सिम सिम’ व ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या त्याच्या गाजलेल्या मालिकांपैकी एक आहेत. त्याने अक्षय कुमारच्या ‘संघर्ष’ व बिपाशा बासू हिच्या ‘राज’ चित्रपटात काम केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमन वर्माने अभिनेत्री वंदना लालवानीशी लग्न केलं होतं. पण ९ वर्षांच्या संसारानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला.