scorecardresearch

Premium

शाहरुख की रणवीर हा वाद सोडाच; पण मूळ ‘डॉन’ चित्रपटही बिग बींच्या आधी ‘या’ तीन कलाकारांना ऑफर झाला होता

७० च्या दशकात या चित्रपटाने बिग बी यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली, पण तुम्हाला ठाऊक आहे का की ‘डॉन’ या पात्रासाठी अमिताभ बच्चन हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते

don
फोटो : सोशल मीडिया / ट्विटर

शाहरुख खान ‘डॉन’ सीरिजमधून बाहेर पडल्याने बरेच चाहते निराश झाले. नुकतंच काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरने रणवीर सिंहची आगामी ‘डॉन’ म्हणून घोषणा केली. ‘डॉन ३’चा टीझरसुद्धा नुकताच प्रदर्शित झाला अन् त्यातील रणवीर सिंहचा लुक पाहून चाहत्यांनी टीकाही केली. शाहरुख खान या सीरिजमधून बाहेर पडण्याआधी ‘डॉन ३’मध्ये शाहरुखसह अमिताभ बच्चनही दिसणार अशी चर्चा रंगली होती.

अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील ‘डॉन’ हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट. आजही चित्रपटरसिक ‘डॉन’ म्हंटलं की बिग बी यांचंच नाव घेतात. ७० च्या दशकात या चित्रपटाने बिग बी यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली, पण तुम्हाला ठाऊक आहे का की ‘डॉन’ या पात्रासाठी अमिताभ बच्चन हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी एका जुन्या मुलाखतीमध्ये याचा उलगडा केला होता.

vinod-khanna
“चित्रपटात काम केलं तर गोळी मारेन”; दिवगंत अभिनेते विनोद खन्ना यांना वडिलांनी दिलेली धमकी, काय आहे ‘तो’ किस्सा? घ्या जाणून
the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
ashutosh-gowariker-biopic
आशुतोष गोवारीकर सादर करणार भारतातील ‘या’ उत्तुंग व्यक्तिमत्त्वावरील बायोपिक; पोस्टरसह केली चित्रपटाची घोषणा
jitendra-awhad-jawan
जितेंद्र आव्हाडांसह बघा शाहरुखचा ‘जवान’; मुंब्रा व कळव्यातील तरूणांना मोफत तिकिटांचे वाटप

आणखी वाचा : शेंगदाणे विकणे, चित्रपटाची पोस्टर चिकटवणे; तीन बत्ती चाळीचा ‘भिडू’ ते बॉलिवूडचा ‘जग्गू दादा’; असा होता जॅकी श्रॉफ यांचा प्रवास

अमिताभ बच्चन यांच्याआधी हा चित्रपट तेव्हाचे सुपरस्टार देव आनंद यांना ऑफर करण्यात आला होता, पण त्यांनी यासाठी नकार दिला. यानंतर चंद्रा बारोट हा चित्रपट घेऊन जितेंद्र आणि मग धर्मेंद्र यांच्याकडेही गेले, पण त्यांनीही यासाठी नकार दिल्यावर अखेर अमिताभ बच्चन यांच्या पदरी ‘डॉन’ ही पात्र पडलं अन् पुढे या चित्रपटाने अशी कामगिरी केली की २०२३ मध्येही या पात्राची भुरळ कलाकारांना पडते आहे.

दिग्दर्शक चंद्रा बारोट यांना त्यांच्या जवळच्या मित्राचे कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे होते अन् यासाठीच त्यांनी हा चित्रपट करण्याचा घाट घातल्याचा त्यांनी खुलासा केला होता. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं नावदेखील ठरलेलं नव्हतं. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाला ‘डॉन वाली स्क्रिप्ट’ असं म्हंटलं जात असे. सध्या ‘डॉन ३’ अन् त्यात झळकणाऱ्या रणवीरची सर्वत्र चर्चा आहे. फर्स्ट लुक पाहून लोकांनी यावर टीका जारी केली असली तरी नेमका चित्रपट प्रेक्षकांवर कितपत प्रभाव टाकेल ते येणारा काळच ठरवेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Before amitabh bachchan chandra barot asked these two actor to play an inconic character don avn

First published on: 25-09-2023 at 19:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×