Bhagyashree suggests Hair Mask to prevent Hair Fall : अभिनेत्री भाग्यश्री ५६ व्या वर्षीही खूपच सुंदर दिसते. तिचं सौंदर्य लक्ष वेधून घेतं. भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती हेल्थ व ब्यूटी टिप्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता तिने केस गळती रोखण्यासाठी तिने एक हेअर मास्कचा व्हिडीओ शेअर केला होता.

भाग्यश्रीचे केस खूपच हेल्दी व चमकदार आहेत. आता तिने चाहत्यांना हेअर केअर टिप्स दिले आहेत. केस गळतीची समस्या असणाऱ्यांसाठी तिने एक हेअर मास्क सांगितला आहे. भाग्यश्रीने या हेअर मास्कबद्दल तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर माहिती दिली आहे. भाग्यश्रीने या हेअर मास्कमध्ये वापरलेले सर्व घटक नैसर्गिक आहेत. पण तरीही, हा मास्क थेट केसांवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

स्वयंपाकघरातील दोन वस्तूंपासून बनवा हेअर मास्क

हा होममेड मास्क बनवण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातील दोन वस्तू लागतील. एक वाटी मेथीचे दाणे आणि एक कप नारळाचे दूध. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, ते केस गळणे आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.

नारळाचे दूध कसे तयार करायचे?

नारळाचे तुकडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत ब्लेंडरमध्ये बारीक करा. नंतर, कापडात हे मिश्रण पिळून त्यातलं दूध वेगळं काढा. या दुधात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असतं. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.

हेअर मास्क कसा बनवायचा?

हेअर मास्क बनवण्यासाठी भिजवलेले मेथीचे दाणे घे, त्यात नारळाचे दूध घाला आणि हे मिक्समध्ये वाटून घ्या आणि एक गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.

पाहा व्हिडीओ

केसांवर हेअर मास्क कसा लावायचा?

हेअर मास्क लावण्यासाठी, सर्वात आधी तुमचे केस दोन भागात विभागून घ्या. नंतर, मास्क मुळांपासून टोकांपर्यंत लावा. केसांना हलक्या हाताने मसाज करा. हा मास्क तुमच्या केसांवर अर्धा तास राहू द्या.

केस धुवून घ्या

अर्ध्या तासानंतर थंड पाणी वापरून हलक्या हाताने मास्क काढा, नंतर केस स्वच्छ करा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हा हेअर पॅक कंडिशनर म्हणून वापरू शकता.