Housefull 5 New Song : ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या फ्रेंचाइजीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. आजवर या सिनेमाचे एकूण चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘हाऊसफुल ४’ २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता यानंतर जवळपास सहा वर्षांनी ‘हाऊसफुल’चा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर आणि पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.

‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील ‘लाल परी’ गाणं सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. अशातच या सिनेमातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं नाव आहे ‘दिल ए नादान’. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, नर्गिस, जॅकलिन, सोनम बाजवा या सगळ्या कलाकारांची झलक प्रेक्षकांना या गाण्यात पाहायला मिळत आहे.

मात्र, या ३ मिनिटं १९ सेकंदाच्या गाण्यातील शेवटचा भाग सर्वाधिक लक्ष वेधून घेतो. कारण, यामध्ये अक्षयबरोबर एका नवीन अभिनेत्रीची झलक सर्वांना पाहायला मिळाली आहे. आता अक्षय कुमारबरोबर गाण्यात झळकणारी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे असा विचार प्रत्येकाच्या मनात आला असेल…पण, ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली ‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा आहे.

irina and akshay kumar housefull 5
Bigg Boss Marathi फेम इरिना अक्षय कुमारबरोबर झळकली

इरिनाला ‘हाऊसफुल ५’मध्ये अक्षयबरोबर झळकण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्रीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, ती केवळ गाण्यात झळकणार की, चित्रपटातही तिची महत्त्वपूर्ण भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, इरिनाबद्दल सांगायचं झालं, तर ‘बिग बॉस मराठी’मध्ये यंदा पहिल्यांदाच ‘परदेसी गर्ल’ने एन्ट्री घेतली होती. इरिना यापूर्वी हिंदी मालिकेत काम केलेलं आहे. याशिवाय IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची चीअरलीडर म्हणून देखील तिने काम केलं आहे. तसेच इरिना योग प्रशिक्षक सुद्धा आहे. आता थेट ‘हाऊसफुल ५’मध्ये झळकण्याची संधी मिळाल्यावर इरिनाच्या करिअरला नक्कीच कलाटणी मिळणार आहे.