महेश मांजरेकर दिग्दर्शिक ‘वास्तव’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपटामधील संजय दत्तची भूमिका तर कमालच होती. अंडरवर्ल्डची दुनिया, गुंडगिरीमध्ये गुंतलेला एक तरुण आणि त्याचभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटातील संजय दत्तचा रघू भाई आणि त्याचा ‘पच्चास तोला’ हा डायलॉग तर आजही प्रत्येकाच्या तोडीं ऐकायला मिळतो. पण ‘वास्तव’च्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक वेगळाच अनुभव महेश मांजरेकर यांनी सांगितला आहे.

आणखी वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘बिग बॉस मराठी’चे स्पर्धक किरण मानेंनी महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’चं कौतुक केलं. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘वास्तव’ प्रदर्शित होण्यापूर्वी महेश यांना एका सुप्रसिद्ध निर्मात्याने एक विचित्र सल्ला दिला. त्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “एक टॉपचा निर्माता ‘वास्तव’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आला होता. तो खरंच सुप्रसिद्ध निर्माता होता. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मी उपस्थित नव्हतो.”

“त्याने चित्रपट पाहिला आणि म्हणाला हा कोणत्या प्रकारचा चित्रपट बनवण्यात आला आहे. जे ‘वात्सव’मधील मुख्य व भावणारे सीन होते तेच सीन त्याला आवडले नव्हते. ज्या सीनमध्ये पारसी महिला संजय दत्तच्या अंगावर थुंकते तो सीन त्याने मला काढून टाकण्याचा सल्ला दिला.”

आणखी वाचा – भुवया व डोक्यावरचे केस गळाले, मालिकाही सोडली अन्…; काही वर्ष गंभीर आजारामुळे त्रस्त होती जुई गडकरी, म्हणाली…

पुढे ते म्हणाले, “चित्रपटामध्ये संजय दत्तची दाखवण्यात आलेली आई (रिमा लागू) त्याला मारते तो सीनही काढून टाक असं त्या निर्मात्यामे मला सांगितलं. चित्रपटाच्या शेवटी त्या गुरुची (संजय दत्त) आई त्याला मारते ती खरंच फालतुगीरी आहे. पारसी महिला थुंकताना दिसत आहे तेही काढून टाक.” निर्मात्याचं हे म्हणणं ऐकून मला धक्काच बसला असल्याचं महेश मांजरेकर यांनी यावेळी सांगितलं. पण त्यांनी जेव्हा ‘वास्तव’च्या निर्मात्यांना याबाबत सांगितलं तेव्हा त्यांनी महेश यांना तुला जे पाहिजे तेच कर असा सल्ला दिला. म्हणूनच ‘वास्तव’ सुपरहिट ठरला.