सुप्रसिद्ध अभिनेते बिजय आनंद, त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री सोनाली खरे व या दोघांची लेक सनाया आनंद या तिघांचेही दोन चित्रपट एका आठवड्याच्या अंतराने प्रदर्शित होत आहेत. बिजय आनंद बॉलीवूड सिनेमात दिसणार आहेत. तर, सोनाली व सनाया या मराठी चित्रपट ‘मायलेक’ मधून १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिजय आनंद यांनी त्यांच्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

बिग बजेट व दमदार स्टारकास्ट असलेले दोन बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर एका दिवसाच्या अंतराने प्रदर्शित होत आहे. अजय देवगणचा ‘मैदान’ आज १० एप्रिलला तर, अक्षय कुमार व टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ११ एप्रिलला प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांच्या क्लॅशबद्दल अभिनेते बिजय आनंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

बिजय आनंद अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा चित्रपटात दिसणार आहेत. दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस क्लॅशबद्दल ते म्हणाले, “आयुष्यात जे चांगलं आहे ते नेहमी चांगलंच करेल.” दोन रेस्टॉरंट्सचे उदाहरण देऊन ते म्हणाले, “उदाहरणार्थ, जर मी तुम्हाला सांगितलं की दोन बिग बजेट रेस्टॉरंट्स एकमेकांच्या शेजारी उघडले आहेत, तर जे चांगलं आहे त्याची कमाई चांगली होईल. दोन्ही चांगले असतील तर दोन्ही चांगले चालतील. दोन्ही चित्रपट उत्तम आहेत आणि उत्तम दिग्दर्शकांनी बनवले आहेत. स्टारकास्टही दमदार आहे. त्यामुळे कोण म्हणतंय की दोन चित्रपट चांगलं काम करू शकत नाही? कोणता सिनेमा चांगला चालतोय हे एकाने दुसऱ्यापेक्षा चांगली कमाई करण्यावर अवलंबून आहे. आणि असं झालं तर तो चित्रपट दुसऱ्यापेक्षा चांगला आहे, असा त्याचा अर्थ होतो.”

“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधील भूमिकेबद्दल बोलताना बिजय आनंद म्हणाले, “चित्रपटाची सुरुवात या एका सीनने होते जिथे ‘बडे मियाँ’ आणि ‘छोटे मियाँ’ यांना भारतीय सैन्यात पाठवलं जातं. कथा माझ्यापासून सुरू होते. मी एका दहशतवाद्याची भूमिका करत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि अर्थातच अक्षय आणि टायगर यांच्यासह काम करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होतील. एकत्र काम करायला मी खूप उत्सुक होतो, आम्ही सेटवर खूप छान वेळ घालवला.”

“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”

या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुरामन देखील नकारात्मक भूमिकेत आहे. तर त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे का असं विचारल्यावर बिजय म्हणाले, “माझा त्याच्याबरोबर सीन नाही, आमच्या भूमिका एकमेकांपासून वेगळ्या आहेत.” अक्षय व टायगरबरोबर काम करण्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. “मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. ते सेटवर नेहमी क्रिकेट किंवा फूटबॉल खेळत असायचे, ते सेटवर इतरांचं मनोरंजन करायचे, जोक करायचे. ते कलाकारांबरोबरच स्पॉट बॉय, शेफ व क्रू मेंबर्सशीही मस्ती करायचे,” असं ते म्हणाले.