Janhvi Kapoor & Varun Dhawan Bijuria Song : जान्हवी कपूर, वरुण धवन, रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा यांचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा सिनेमा येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या सिनेमातील ‘बिजुरिया’ हे रिमेक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बिजुरिया’ हे मूळ गाणं जवळपास २६ वर्षे जुनं आहे. सोनू निगमच्या म्युझिक अल्बममधील हे सुपरहिट गाणं आता २६ वर्षांनी बॉलीवूड सिनेमात प्रदर्शित करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर सर्वत्र सध्या ‘बिजुरिया’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. जान्हवी-वरुणची जबरदस्त केमेस्ट्री, अभिनेत्रीचा बोल्ड लूक, या गाण्याची हूकस्टेप या सगळ्याच गोष्टी सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे आता नेटकरी सुद्धा या गाण्यावर रील्स व्हिडीओ शेअर करू लागले आहेत.
‘सुपर डान्सर चापटर ५’ या शोमध्ये सहभागी झालेली चिमुकली डान्सर बरकत अरोराने नुकताच ‘बिजुरिया’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. लाल रंगाचा सुंदर लेहंगा घालून ही चिमुकली ‘बिजुरिया’ गाण्यावर थिरकली आहे. इतकंच नव्हे तर या व्हिडीओमध्ये तिने जान्हवीसारख्या हुबेहूब हुकस्टेप सुद्धा केल्या आहेत. चिमुकल्या बरकत अरोराच्या कमाल एक्स्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
बरकतने शेअर केलेल्या या व्हिडीओला अवघ्या एक दिवसातच ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा चिमुकल्या बरकतच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
“गुडीया रानी”, “कोणाची नजर नको लागूदेत”, “अरे ही किती सुंदर नाचलीये”, “क्युट डान्स”, “कमाल एक्स्प्रेशन्स”, “याला म्हणतात परफॉर्मन्स” अशा प्रतिक्रिया बरकतच्या व्हिडीओवर युजर्सनी दिल्या आहेत.
दरम्यान, ‘बिजुरिया’ हे मूळ गाणं सोनू निगमच्या १९९९ च्या ‘मौसम’ या अल्बममधील आहे. आता हे गाणं रिमेक होऊन सिनेमात प्रदर्शित करण्यात आलं आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर २’बरोबर क्लॅश होणार आहे.