बॉलीवूडचा ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता बॉबी देओल गेल्या काही दिवसांपासून ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने या चित्रपटात अबरार हक ही खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याच्या खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ‘अ‍ॅनिमल’मधील उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त त्याचं “जमाल कुडू” गाणं विशेष लक्षात राहतं. बॉबीने या गाण्यात केलेल्या आकर्षक हुकस्टेपमुळे हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं.

धर्मेंद्र यांच्या नातीच्या म्हणजेच निकिता चौधरीच्या लग्नसोहळ्यासाठी बॉबी देओल आणि देओल कुटुंब सध्या उदयपूरमध्ये आहेत. निकिताच्या संगीत समारंभात, बॉबी देओलने पुन्हा एकदा “जमाल कुडू” गाण्याची हुकस्टेप करत नृत्य सादर केलं. हा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा… अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल एक्स गर्लफ्रेंडने सोडलं मौन; म्हणाली, “एका रोमँटिक नात्याचा अंत…”

मिस मालिनी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे . उदयपूरमध्ये सुरू असलेल्या निकिताच्या संगीत सोहळ्यात बॉबी देओल डोक्यावर ग्लास घेऊन उत्तमरित्या नृत्य करत आहे. या संगीत सोहळ्यासाठी त्याने काळ्या रंगाचा स्टायलिश कुरता, मॅचिंग जॅकेट आणि सफेद रंगाच्या पायजम्याची निवड केलेली दिसते. इतर पाहुणे आणि स्टेजवरील नातेवाईक बॉबी देओलचा डान्स पाहून यात सामील झाले आणि सगळेच या सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

हेही वाचा… प्रसिद्ध अभिनेत्याच्या चित्रपटाचं भररस्त्यात शूटिंग, लोकांनी तक्रार केल्यावर पोलीस पोहोचले अन्…, पाहा Video

अभिनेता अभय देओलनेही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्याने निकिता चौधरी आणि रुषभ शाह यांच्या लग्नातील फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत अभय म्हणाला, “वधू आणि वराला त्यांच्या जीवनातील या नवीन अध्यायासाठी कृपया तुमचे आशीर्वाद द्या. माझी भाची इतकी मोठी झाली आहे आणि एक उत्कृष्ट स्त्री बनली आहे, तरीही मला ती अजून लहानच वाटते.”

नववधू निकिता चौधरी ही अजिता देओल आणि डॉ. किरण चौधरी यांची मुलगी आहे. अजिता ही धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची सर्वात लहान मुलगी आहे. अजिता, किरण चौधरी आणि त्यांचे कुटुंब कॅलिफोर्नियाला राहतात. निकिता चौधरी ही दंतचिकित्सक आहे.

हेही वाचा… “विजू आणि मी एकत्र…”, रश्मिका मंदानाचं विजय देवरकोंडाबद्दल विधान; म्हणाली, “प्रत्येक गोष्टीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बॉबी देओलच्या कामाबाबत बोलायचं झालं तर त्याचा आगामी चित्रपट कंगुवा आहे. हा तामिळ चित्रपट असून यावर्षीच प्रदर्शित होणार आहे. तसेच हरी हरा वीरा मल्लू या तेलुगू सिनेमामध्येही बॉबी देओल काम करणार आहे.