अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नात बॉबी देओल, त्याची पत्नी तान्या, लेक आर्यमान यांचे पारंपारिक लूक पाहायला मिळाले होते. करणच्या लग्नात सनी व त्याची पत्नी पूजापेक्षा बॉबी आणि तान्याचीच जास्त चर्चा होती. बॉलिवूडमधील हे लोकप्रिय जोडपं नुकतंच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झालं. यावेळी बॉबीचा लूक पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

पहिल्या डेटवर कधी सेक्स केला आहे का? तमन्ना भाटिया व विजय वर्मा म्हणाले…

‘इन्स्टंट बॉलिवूड’ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बॉबी जीन्स व बनियानवर दिसून आला. तर, त्याची पत्नी डेनिम स्कर्ट व टॉपमध्ये सुंदर दिसत होती. एकूणच बॉबीचा हा लूक नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. त्यामुळे ते त्याला ट्रोल करत आहेत.

‘डिनरसाठी हॉटेलमध्ये जाताना अशा प्रकारचे कपडे घालू नये, तुझ्यापेक्षा तुझ्या पत्नीने चांगले कपडे घातले आहेत,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
bobby deol
पोस्टवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘धर्मेंद्र यांचा मुलगा भिखारी वाटतोय,’ ‘असे कपडे घालायचे असतील तर इतका पैसा कोणत्या कामाचा,’ ‘बॉबीचा घुटना लीक होतोय,’ अशा कमेंट्स युजरने केल्या आहेत.