अर्जुन कपूर मलायका अरोरा हे सध्या बॉलिवूडमधील चर्चेतील जोडी आहे, लंडन ट्रिप असो किंवा डिनर डेट दोघे एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसून येतात. आपापल्या सोशल मीडियावरदेखील ते सक्रिय असतात. नुकतीच अर्जुन कपूरने मलायकाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने दोघांचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहला आहे ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी स्वतःसारखीच रहा, आनंदी राहा माझी रहा’, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत’.

मलायका अरोरा ही सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी तिची सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. मलायकाच्या फॅशनची कायमच चर्चा होत असते. अर्जुन कपूर नुकताच एक ‘व्हिलन रिटर्न’ चित्रपटात दिसला होता. मलायकाने देखील लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला होता. सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतल्यावर मलायका आता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुन कपूर मलायका एकमेकांना डेट करायला लागल्यापासून हे दोघे लग्न कधी करणार यावरून त्यांचा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र तिने एका मुलाखतीत सध्या लग्नाचा विचार नाही असे तिने स्पष्ट केले आहे.