scorecardresearch

वर्षाची सुरवात बॉलिवूडसाठी निराशाजनक; अर्जुनच्या ‘कुत्ते’ चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनेदेखील या चित्रपटात काम केले आहे

वर्षाची सुरवात बॉलिवूडसाठी निराशाजनक; अर्जुनच्या ‘कुत्ते’ चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

गेल्या काही दिवसांपासून ‘कुत्ते’ (Kuttey) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या हटके पोस्टरची चांगलीच चर्चा झाली होती. शिवाय चित्रपटाचा ट्रेलर झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती, मात्र चित्रपट प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहता ‘कुत्ते’ची कथा गुन्हेगारी विश्वावर आधारित असल्याचं पाहायला मिळतं. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असूनदेखील चित्रपट पहिल्या दिवशीच केवळ १. ७ कोटींची कमाई करू शकला. दुसऱ्या दिवशी फक्त १. २५ कोटी मावल्याचे प्राथमिक अंदाज सुचवतात. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार चित्रपटाला टिकून राहायचे असेल तर मोठी झेप घ्यावी लागेल.

शाहरुखचा ‘पठाण’ ‘गांधी गोडसे’ला टक्कर देणार का? चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले….

या चित्रपटात अर्जून-तब्बूसह नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदन आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये अर्जुनचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. तर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचीही यामध्ये झलक दिसते. डार्क कॉमेडी थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन आसमान भारद्वाजने केलं आहे. १३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 12:55 IST

संबंधित बातम्या