scorecardresearch

“चित्रपटगृहातील पॉपकॉर्न…” बॉलिवूडचा भिडू जॅकी श्रॉफ यांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे विनंती

योगी यांना घरी जेवणासाठीदेखील जॅकी श्रॉफ यांनी आमंत्रण दिलं

“चित्रपटगृहातील पॉपकॉर्न…” बॉलिवूडचा भिडू जॅकी श्रॉफ यांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे विनंती
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईतील चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये तयार होणाऱ्या फिल्म सिटीमध्ये चित्रपटांचे शूटिंग करताना हिंदी चित्रपट निर्मात्यांना मिळू शकणार्‍या विविध संधींबद्दल चर्चा केली. या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे बरेच कलाकार उपस्थित होते.

यावेळी या दिग्गज लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीबद्दल तसेच बॉलिवूड चित्रपटांच्या वाईट काळाबद्दल बरीच चर्चा केली. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या ट्रेंडला आळा घालायची मागणी सुनील शेट्टीने योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली, तर जॅकी श्रॉफ यांनीसुद्धा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले.

आणखी वाचा : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; ‘या’ मौल्यवान वस्तूसह मोलकरीण पसार

सध्या आपल्या देशात अजूनतरी चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे, त्यामुळे चित्रपट बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांना नाईलजास्तव तिथले महागडे पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक खरेदी करावे लागते. हीच समस्या जॅकी श्रॉफ यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासमोर मांडली. चित्रपटगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची किंमत कमी करण्यासाठी त्यांनी विनंती केली.

जॅकी श्रॉफ यांनी योगी आदित्यनाथ यांना विनंती करत सांगितलं, “सर थिएटरमध्ये मिळणारया पॉपकॉर्नची किंमत कमी करा. ५०० रुपये घेतात पॉपकॉर्नचे. आम्ही चित्रपट बनवू, स्टुडिओ बनवू पण आतमध्ये प्रेक्षक आले तरच त्याचा फायदा होणार ना.” इतकंच नाही पॉपकॉर्नची क्वान्टीटीसुदड कमी करण्याची जॅकी यांनी विनंती केली आहे. शिवाय मुंबईत आलेल्या योगी यांना घरी जेवणासाठीदेखील जॅकी श्रॉफ यांनी आमंत्रण दिलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या