बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक मानला जातो. ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून कार्तिकला खरी ओळख मिळाली. विशेष म्हणजे तो आता बॉलिवुडमधील सर्वात महागडा कलाकार म्हणून ओळखला जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने सांगितले की तो यासाठी पात्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार म्हणून ओळखले जातात. कार्तिक आर्यन सध्या त्याच्या शेहजादा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याने आपल्या मानधनाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटासाठी त्याला १.२५ लाख रुपये मिळाले होते हा त्याचा पहिला चित्रपट होता. मात्र करोना महामारी दरम्यान बनवलेल्या चित्रपटासाठी त्याला २० कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. असे त्यानेच कबुल केले आहे.

काँग्रेसकाळात ‘गांधी गोडसे’ चित्रपट प्रदर्शित होण्यास अडचणी आल्या असत्या का? दिग्दर्शक म्हणाले…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यनला निर्माता राम माधवानी यांनी २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘धमाका’ या चित्रपटाच्या १० दिवसांच्या चित्रीकरणासाठी २० कोटी मानधन दिले होते. यावर त्याने सांगितले की, “ही करोना काळातील गोष्ट आहे तेव्हा या गोष्टीवर चर्चा करावी का हे मला कळत नव्हते. पण हो त्याकाळात मी ‘धमाका’ नावाचा चित्रपट केला ज्याचे चित्रीकरण १० दिवसांचे होते त्यामुळे मी इतके मानधन घेतले. निर्मात्यांचे पैसे मी २० दिवसात दुप्पट करून दाखवतो त्यामुळे मी इतकी फी आकारण्याची स्वतःला लायक समजतो.”

कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शेहजादा’ १० फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येईल. कार्तिक आर्यनच्या या अॅक्शन पॅकेज थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २०२२ मध्ये त्याने ‘भूलभुलैया २’ हा सुपरहिट चित्रपट दिला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor kartik aryan charged 20 crores for 10 days shooting spg
First published on: 22-01-2023 at 18:24 IST