बॉलिवूडचा आजचा आघाडीचा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन, अगदी काही वर्षांत त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच त्याचा ‘शहजादा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करू शकला नाही. तरीदेखील त्याची क्रेझ कमी झालेली नाही. कार्तिक आर्यन नुकताच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला आहे. चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्तिक आर्यन सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. “परदेशात आपल्या देशाची भावना, अमेरिकेतील माझी ही पहिलीच वेळ ठरली अविश्वसनीय. एवढ्या प्रेमाबद्दल धन्यवाद डल्लास. ही होळी नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहील.”असा कॅप्शन त्याने दिला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता पांढरा शर्ट आणि निळा डेनिम परिधान केलेला दिसत होता.

गांधीगिरीनंतर आता संजू बाबा करणार ‘हेरा फेरी’; तिसऱ्या भागात झळकणार, अभिनेत्याने केला खुलासा

व्हिडीओमध्ये तो गाडीवर उभा राहूं प्रेक्षकांना अभिवादन करत आहे. हजारो चाहत्यांची गर्दी दिसत आहे. यावेळी अमेरिकेत होळी साजरी केल्याचं दिसत आहे.चाहत्यांनी लाडक्या स्टारला बघितल्यावर आनंद साजरा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत आहेत. एकाने लिहले आहे “कार्तिक आम्हाला तुझा अभिमान आहे” तर दुसऱ्याने लिहिले आहे, “इंडस्ट्रीतील नवीन उगवता सुपरस्टार” तिसऱ्याने लिहले आहे, “भाऊ तुम्हाला चमकताना पाहून आनंद झाला. माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत.” आणखीन एकाने लिहले आहे “हा भावी शाहरुख आहे का?”

कार्तिक आर्यन आता ‘भूल भुलैय्या २’ नंतर तिसऱ्या भागातदेखील दिसणार आहे. नुकतीच त्याने याबद्दल घोषणा केली आहे. दिवाळीत या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर कार्तिक आर्यन ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor kartik aryan visited usa fans greet him netizens said he will be next shahrukh khan spg
First published on: 06-03-2023 at 18:49 IST