आज धुळवडीच्या रंगात सगळे रंगून गेले आहेत. प्रत्येकाने उत्साहात, आनंदाच्या वातावरणात धुळवड साजरी केली आहे. कलाकार मंडळी देखील मोठ्या जल्लोषात होळी साजरी करताना पाहायला मिळाले. सध्या कलाकार मंडळींचे रंगात रंगून गेलेले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच रणबीर कपूर व आलिया भट्ट यांचा होळी खेळताना व्हिडीओ समोर आला आहे.

रणबीर कपूर व आलिया भट्ट हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. दोघांचे व्हिडीओ, फोटो हे सोशल मीडियावर कायम व्हायरल होतं असतात. नुकताच दोघांचा राहासह होळी साजरी करतानाचा व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा आहे खूप हँडसम, जाणून घ्या अमेय नारकरबद्दल

या व्हिडीओत, रणबीर कपूर व आलिया भट्ट आपल्या शेजाऱ्यांबरोबर होळी खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळी चिमुकली राहा देखील दिसत आहे. रणबीर, आलिया आणि राहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितीक्षा तावडे नवऱ्याबरोबर खेळली लग्नानंतरची पहिली धुळवड, पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणबीर-आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच रणबीर नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर प्रभु श्रीरामाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर आलिया लवकरच ‘जिगरा’ या चित्रपटात दिसणार आहे.