अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटचा प्री-टीझन ११ जूनला प्रदर्शित झाला होता. या टीझरच्या माध्यमातून हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण आता रणबीरच्या चाहत्यांना, त्यांच्या बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. डिसेंबर २०२३मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – सोनू सूदनं रिया चक्रवर्तीसाठी बनवला डोसा, व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा खून….”

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या टीमनं अद्याप प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण चित्रपट तज्ञ तरण आदर्शनं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, “स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यामध्ये म्हणजेच ११ ऑगस्टला ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. नव्या तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही प्रदर्शनाची नवी तारीख येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होईल.”

हेही वाचा – …अन् सलमान खानने ‘बिग बॉस ओटीटी’च्या प्रेक्षकांची मागितली जाहीर माफी, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, वीएफएक्समुळे ‘अ‍ॅनिमल’चं प्रदर्शनं पुढे ढकलण्यात आलं आहे. वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट असल्यामुळे दिग्दर्शकला या चित्रपटासाठी अजून वेळ पाहिजे. या चित्रपटासाठी टीम रात्रंदिवस काम करत आहे. परंतु अ‍ॅक्शन सीन्स तगडे असल्यामुळे ११ ऑगस्टपर्यंत चित्रपट पूर्णपणे तयार होणं कठीण आहे. त्यामुळे अभिनेता रणबीर कपूरसह निर्मात्यांनी ‘अ‍ॅनिमल’ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाचा आलियाच्या सीतेच्या भूमिकेवर आक्षेप; म्हणाले, “अभिनेत्री टॅलेंटेड पण…”

यामुळे सध्या १ डिसेंबर २०२३ रोजी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. या चित्रपटात रणबीरबरोबर अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.