संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. १ डिसेंबर २०२३ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलं वेड लावलं आहे. काल, ६ जानेवारीला चित्रपटाची सक्सेस पार्टी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला चित्रपटातील कलाकारांसह इतर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

काल ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. चित्रपटातील कलाकारांसह आलिया भट्ट, महेश भट्ट, नीतू कपूर, तमन्ना भाटिया, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, राशा थडानी, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय असे अनेक बॉलीवूडचे कलाकार उपस्थित होते. अशातच रणबीर कपूरने रश्मिका मंदानाला किस केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा किस व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: सईचं कोळी कुटुंबात होतं जोरदार स्वागत, ‘या’ कृतीमुळे सागर जिंकतो मुक्ताचं मन

Voompla या इन्स्टाग्राम पेजवर रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रश्मिकाचं पार्टीत स्वागत करताना रणबीर तिला मिठी मारून गालावर किस करताना दिसत आहे. त्यानंतर इतर कलाकार देखील रश्मिकाला मिठी मारून, हात मिळवत तिचं स्वागत करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री बॉडीकॉन ड्रेस आणि मोकळ्या केसात फारचा सुंदर दिसत होती.

हेही वाचा – “…तर मी आज दिसले नसते”, मोठ्या अपघातातून ‘अशा’ सावरल्या सुकन्या मोने, प्रसंग सांगत म्हणाल्या, “अंधत्व आलं, स्मृती गेली… “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातून पहिल्यांदाच रणबीर-रश्मिकाची जोडी मोठ्या पडद्यावर झळकली आणि ही जोडी सुपरहिट ठरली. रणबीरने साकारलेला रणविजय आणि रश्मिकाने साकारलेली गीतांजली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.