Hurun rich list 2024: बॉलीवूडचा बादशाह किंग खानच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्याच्या नावाचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. याचबरोबर तो बॉलीवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता झाला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये किंग खानने हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.

ताज्या अहवालानुसार, एका वर्षात शाहरुख खानच्या संपत्तीत तब्बल एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये शाहरुख खानने भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीनुसार, शाहरुखची एकूण संपत्ती ७,३०० कोटी रुपये आहे. तर, फोर्ब्स २०२३ च्या अहवालानुसार, मागच्या वर्षी त्याची एकूण संपत्ती ६,३०० कोटी रुपये होती. एका वर्षात शाहरुख खानच्या संपत्तीत एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी

यादीतील इतर बॉलीवूड कलाकार

शाहरुख खान व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, जुही चावला, करण जोहर आणि हृतिक रोशन यांचीही नावे या यादीत आहेत. या स्टार्सनीही या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवलं आहे. यादीनुसार, अमिताभ बच्चन यांची संपत्ती १६०० कोटी, जुही चावलाची एकूण संपत्ती ४,६०० कोटी, हृतिक रोशनची संपत्ती दोन हजार कोटी आणि करण जोहरची एकूण संपत्ती १४०० कोटी आहे. या यादीत शाहरुख खाननंतर जुही चावलाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि शेवटी करण जोहरचे नाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानच्या कमाईचे स्रोत

शाहरुख खान जाहिराती व चित्रपटांमधून मोठी कमाई करतो. तसेच काही चित्रपटांच्या नफ्यामध्ये स्टार्सचा वाटा असतो. ‘पठाण’च्या एकूण कमाईपैकी शाहरुखला ६० टक्के नफा मिळाला असं म्हटलं जातं. त्यानुसार त्याने या चित्रपटातून २०० कोटी रुपये कमावले. तसेच किंग खानचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस आहे. यातून दरवर्षी तो जवळपास ५०० कोटींची कमाई करतो.